Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Team India Probable Playning XI, IND vs ENG रोहित, विराट, बुमराह, गिल संघात सामील होताच, ‘या’ चार खेळाडूचा पत्ता कट

कर्णधार शुभमन गिलवर मोठी जबाबदारी असणार आहे. त्याच्यासोबत रोहित शर्मा आणि विराट कोहली हे अनुभवी फलंदाज संघाच्या धावांचा पाया रचतील, अशी अपेक्षा आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 14, 2026 | 03:37 PM
Team India Probable Playning XI, IND vs ENG रोहित, विराट, बुमराह, गिल संघात सामील होताच, ‘या’ चार खेळाडूचा पत्ता कट
Follow Us
Follow Us:

टी-20 मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघ आता नव्या जोमाने मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. इंग्लंडविरुद्ध आजपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेत विजय मिळवत मागील अपयश मागे टाकण्याचे लक्ष्य टीम इंडियासमोर आहे. पावसामुळे पहिला टी-20 सामना रद्द झाला होता, तर त्यानंतरचे चारही सामने भारताच्या हातातून निसटले. त्यामुळे आता चाहत्यांच्या अपेक्षा वनडे मालिकेवर टिकून आहेत.

या सामन्यात भारताचा संघ कसा असेल, याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींमध्ये वाढली आहे. कर्णधार शुभमन गिलवर मोठी जबाबदारी असणार आहे. त्याच्यासोबत रोहित शर्मा आणि विराट कोहली हे अनुभवी फलंदाज संघाच्या धावांचा पाया रचतील, अशी अपेक्षा आहे. मधल्या फळीत श्रेयस अय्यर संघाला स्थिरता देण्याची भूमिका निभावू शकतो.

ऑपनिंगला रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी मैदानात उतरणार असण्याची शक्यता आहे. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर फलंदाजीची धुरा सांभाळतील. यष्टिरक्षक म्हणून केएल राहुलला संधी मिळण्याची शक्यता अधिक मानली जात आहे. राहुलच्या अनुभवाचा संघाला महत्त्वाच्या क्षणी फायदा होऊ शकतो.

IND Vs ENG Live: आज होणार महामुकाबला! भारताविरुद्ध इंग्लंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

संघ व्यवस्थापन संतुलित संघरचना ठेवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे शिवम दुबे, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या अष्टपैलू खेळाडूंना अंतिम अकरामध्ये स्थान मिळू शकते. हे तिन्ही खेळाडू फलंदाजीसोबत गोलंदाजीतही प्रभावी योगदान देऊ शकतात. त्यामुळे संघाला अतिरिक्त पर्याय उपलब्ध राहतील.

गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या खांद्यावर असण्याची शक्यता आहे. याशिवाय युवा फिरकीपटू गुरनूर ब्रारलाही संधी मिळू शकते. अलीकडील सामन्यांमध्ये त्याने चांगली छाप पाडली असून, त्याच्या कामगिरीमुळे संघ व्यवस्थापन त्याच्यावर विश्वास दाखवू शकते. इंग्लंडमधील परिस्थिती लक्षात घेता त्याची निवड भारतासाठी फायदेशीर ठरू शकते.

दुसरीकडे काही खेळाडूंना पहिल्या सामन्यात प्रतीक्षा करावी लागू शकते. प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, प्रिन्स यादव आणि इशान किशन यांना अंतिम संघाबाहेर ठेवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मालिकेतील पुढील सामन्यांमध्ये परिस्थितीनुसार त्यांना संधी मिळू शकते.

दरम्यान, इंग्लंडने पहिल्या वनडेसाठी आपला अंतिम संघ आधीच जाहीर केला आहे. जेकब बेथेल आणि बेन डकेट सलामीची जबाबदारी सांभाळतील. अनुभवी जो रूट, कर्णधार हॅरी ब्रूक आणि जोस बटलर यांच्यावर फलंदाजीची मोठी जबाबदारी असेल. तर जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि जोश टंग यांच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांची खरी परीक्षा लागणार आहे.

रणरागिणी भडकल्या अन् क्रिकेटच्या पंढरीत…! HarmanPreet Kaur ने इंग्लंडविरुद्ध मोडला ‘हा’ महारेकॉर्ड

 

पराभवाची मालिका संपवून विजयी सुरुवात करण्यासाठी भारत पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे इंग्लंडही आपला विजयी आत्मविश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे पहिल्याच वनडे सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता असून, क्रिकेट चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

Web Title: With rohit virat bumrah and gill joining the squad these four players have been dropped

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • Captain Rohit Sharma
  • cricket
  • indian cricket team

संबंधित बातम्या

IND Vs WI: जिंकावेच लागेल! ‘ही’ परंपरा खंडीत ठेवण्यासाठी Shreyas Iyer समोर मोठे आव्हान
1

IND Vs WI: जिंकावेच लागेल! ‘ही’ परंपरा खंडीत ठेवण्यासाठी Shreyas Iyer समोर मोठे आव्हान

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला
2

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला

Sara Tendulkar Birthday: ‘माझी लेक आता…’ साराच्या वाढदिवशी Sachin Tendulkarची भावनिक पोस्ट; बाप-लेकीच्या नात्याची खास झलक
3

Sara Tendulkar Birthday: ‘माझी लेक आता…’ साराच्या वाढदिवशी Sachin Tendulkarची भावनिक पोस्ट; बाप-लेकीच्या नात्याची खास झलक

भविष्यवाणीत देखील पाकड्यांना जागा नाही! World Cup सेमीफायनलमध्ये ‘हे’ संघ जाणार? Aaron Finch म्हणाला…
4

भविष्यवाणीत देखील पाकड्यांना जागा नाही! World Cup सेमीफायनलमध्ये ‘हे’ संघ जाणार? Aaron Finch म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.