विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
American player breaks Virat Kohli’s record : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अनेक विक्रम रचले आहेत तर अनेक विक्रम मोडले देखील आहेत. परंतु, आता य दिग्गज खेळाडूला एका अमेरिकेच्या फलंदाजाने मागे टाकले आहे. अमेरिकेचा फलंदाज मिलिंद कुमारने एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. त्याने फलंदाजीच्या सरासरीचा विश्वविक्रम रचला आहे. तो जगभरातील किमान २० एकदिवसीय डाव खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.३४ वर्षीय फलंदाज मिलिंद कुमारने रायन टेन डोइशेत आणि विराट कोहली सारख्या ५० षटकांच्या फॉरमॅटच्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकत ही कामगिरी करून दाखवली आहे.
मिलिंद कुमारने विश्वविक्रम केला
विराट कोहली आणि रायन टेन डोइशेत यांना धोबी पछाड देत मिलिंद कुमारने विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. अमेरिकेचा फलंदाज मिलिंद कुमारची फलंदाजी सरासरी आता ६७.७३ इतकी आहे. ३ नोव्हेंबर रोजी अमेरिका आणि युएई दरम्यान झालेल्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या नाबाद १२३ धावांची खेळी केली, या दरम्यान मिलिंदने हा टप्पा गाठला. हा त्याचा सलग चौथा डाव होता ज्यामध्ये त्याने अर्धशतक नाही तर ७० पेक्षा अधिक धावा केल्या. त्यापैकी दोन डाव त्याने नेपाळविरुद्ध खेळले होते, तर त्याने युएईविरुद्ध एका डावात ७१ धावा फटकावल्या होत्या.
आजपर्यंत, एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाज ६७.७३ च्या फलंदाजी सरासरीपर्यंत पोहचू शकलेले नाही. हा आकडा ५० षटकांच्या स्वरूपात किमान २० डाव खेळलेल्या फलंदाजांसाठी आहे. यापूर्वी, ६७ च्या सरासरीने हा विक्रम नेदरलँड्सच्या रायन टेन डोइशेतच्या नावावर जमा होता. विराट कोहली ५७.७१ च्या फलंदाजी सरासरीसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. शुभमन गिल ५६.३६ च्या फलंदाजी सरासरीसह चौथ्या स्थानी आहे.
विराट कोहलीला मागे टाकणारा हा खेळाडू विराटचा जुना सहकारी आहे. मिलिंद कुमारने दिल्लीसाठी रणजी क्रिकेट आणि आरसीबीसाठी आयपीएल खेळलेला आहे. यामुळे, तो विराट कोहलीसोबत ड्रेसिंग रूम शेअर करताना देखील दिसला होता.
अमेरिका आणि युएई यांच्यात झालेल्या सामन्यात अमेरिकेने युएईचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने मिलिंद कुमार आणि सैथेजा मुक्कामल्ला यांच्या शतकांच्या जोरावर २९४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल युएईचा डाव फक्त ४९ धावांवर संपुष्टात आला.






