केरीची हुशारी फसली, डेव्हिड बेडिंगहॅमचा मोठा डाव(फोटो-सोशल मीडिया)
SA vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ २१८ धावांची आघाडी घेत मजबूत स्थतीत दिसत आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ सर्वबाद २१२ धावा करू शकला. २१२ धावांचा पाठलाग करताना पहिल्या दिवशीच साऊथ आफ्रिका संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. साऊथ आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर गडगडला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेऊन साऊथ आफ्रिकेचे कंबरडे मोडले आहे. परंतु, या सामन्यात असे काहीतरी घडले की ज्यामुळे सर्वांना आपले हसू आवरता आले नाहीत.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डावात २१२ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरादाखल, दक्षिण आफ्रिकेची देखील स्थिती अत्यंत वाईट झाली आणि संघ फक्त १३८ धावांवर गारद झाला. तथापि, डेव्हिड बेडिंगहॅम प्रोटीज संघासाठी एकटाच झुंज देत राहिला. परंतु, या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर एक अनोखी घटना घडली.
ऑस्ट्रेलियीन विकेटकीपर अॅलेक्स केरीने आपल्या हुशारीचावापर करून डेव्हिड बेडिंगहॅमची विकेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्याचे हेतू प्रथम दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने आणि नंतर पंचांनी उधळून लावले.
बेडिंगहॅम ३१ धावा काढत क्रीजवर स्थिरावू पाहत होता. तो शानदार फलंदाजी करताना दिसत होता. कांगारू संघ त्याची वीकेट काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर डावाच्या ४९ व्या षटकामध्ये एकं घटना घडली. या षटकातील तिसरा चेंडू बेडिंगहॅमच्या पायाला लागला आणि तो पॅडमध्ये जाऊन अडकला. यष्टीरक्षक अॅलेक्स केरीला चेंडू पॅडमध्ये अडकलेला दिसताच त्याने वेगाने पुढे येत तो चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, बेडिंगहॅमला कॅरीची ही हालचाल कळली आणि त्याने तात्काळ त्याच्या पॅडमधून चेंडू काढून मैदानावर फेकून दिला.
केरी त्याच्या हेतूंमध्ये अपयशी ठरला. त्यानंतर केरी आणि स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणारे उस्मान ख्वाजायांच्याकडून बेडिंगहॅमला चेंडू पकडण्याविरुद्ध अपील देखील करण्यात आले. तथापि, पंचांनी त्यांचे अपील फेटाळून लावले. पंचांच्या मते, चेंडू पॅडमध्ये अडकल्यावरच मृत झाला होता. हे संपूर्ण दृश्य पाहून कांगारू कर्णधार पॅट कमिन्ससह स्टेडियममध्ये उपस्थित असलेले सर्वजण हसायला लागले होते.
हेही वाचा : SA vs AUS : कगिसो रबाडाने रेकाॅर्ड पुस्तकाची पानं पालटली! दिग्गज जॅक कॅलिसला टाकलं मागे
दक्षिण आफ्रिकेका पहिल्या डावात १३८ धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेऊन साऊथ आफ्रिकेचे संघ नेस्तनाबूत केला. आता ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावात ८ गडी गमावून १४४ धावा झाल्या आहेत. सदया ऑस्ट्रेलियाने २१८ धावांची महत्त्वाची आघाडी मिळवली आहे. मिशेल स्टार्क आणि नॅथन लायन हे खेळत आहेत.