2025 मध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी घेतली निवृत्ती(फोटो-सोशल मीडिया)
Indian cricketers’ retirement in 2025 : भारतीय क्रिकेटमध्ये 2025 या वर्षी अनेक घडामोडी घडल्या आहेत. यावर्षी भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2013 नंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद जिंकले. तसेच सूर्यकुमार यादवने आपल्या कर्णधारपदाच्या पहिल्याच प्रयत्नात भारताला टी 20i आशिया कप जेतेपद पटकावून दिले. ट्रॉफी मिळवून दिली. तसेच सूर्याच्या नेतृत्वात भारताने 2025 या वर्षातील शेवटची टी 20i मालिका 3-1 फरकाने आपल्या खिशात टाकली आहे. तसेच भारताला कसोटी मालिकेत मात्र मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. कसोटी क्रिकेटमधील पराभव सोडला तर भारताने या वर्षात अप्रतिम कामगिरी बजावली आहे. मात्र 2025 या वर्षात भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडूंनी क्रिकेटला कायमचा रामराम ठोकला. याबद्दल जाणून घेऊया.
भारताचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी इंग्लंड दौऱ्याआधी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. विराट आणि रोहित या दोघांनी वर्ल्ड कप विजयानंतर टी 20i क्रिकेटला देखील अलविदा म्हटले होते. आता हे स्टार खेळाडू केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत.
भारताचा भरावशाचा खेळाडू राहिलेला चेतेश्वर पुजाराने भारतीय संघात परतण्यासाठी संघर्ष केला अखेर त्याने नाईलाजाने क्रिकेटचा निरोप घेतला. चेतेश्वर पुजाराला गेल्या अनेक वर्षांपासून निवड समितीकडून डावलण्यात आले. त्यामुळे अखेर पुजाराने निवृत्तीची घोषणा केली.
भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋद्धीमान साहाने 1 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली आहे. साहाने भारतीय संघासाठी अनेक सामन्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
भारतीय संघाचा लेग स्पिनर अमित मिश्रा गेली अनेक वर्ष भारतीय संघातून मोठा काल बाहेर राहील आहे. त्यामुळे त्याने निवृत्त होणे अपेक्षित होते. अमितने सप्टेंबर 2025 मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचे घोषित केले. तसेच टी 20i 2007 आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकातील विजयी संघातील फिरकीपटू पीयूष चावलाने देखील 2025 मध्ये निवृत्ती घोषित केली. तसेच वेगवान गोलंदाज मोहित शर्माने देखील क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.
हेही वाचा : IND W vs SL W : दीप्ती शर्माने गाजवले 2025 हे वर्ष! ‘या’ विक्रमासह प्रस्थापित केला खास दबदबा
यावर्षी वेगवान गोलंदाज वरुण एरॉन याने देखील वर्षाच्या सुरुवातीला सर्वच प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. वरुणने त्यानंतर कॉमेंटेटर म्हणून सेंकड इनिंगला सुरुवात देखील केली आहे. तसेच ऑलराउंडर ऋषी धवन याने देखीलजानेवारी महिन्यात क्रिकेटला कायमचा अलविदा म्हटले आहे. भारताचा अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा याने टी 20i क्रिकेमधून निवृत्ती घेतली आहे.






