फोटो सौजन्य - Proteas Men
कागिसो रबाडाचा नवा रेकाॅर्ड : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना सुरू आहे. या फायनलच्या सामन्याचा दुसरा दिवस पार पडला या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला दुसऱ्या डावामध्ये दुसरा दिनाच्या समाप्तीवर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आठ विकेट्स घेतले होते. पहिल्या डावामध्ये देखील ऑस्ट्रेलियन संघाला दक्षिण आफ्रिकेच्या संघाने त्यांचे 212 धावांवरून गुंडाळले. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने चाहत्यांचे लक्ष वेधले त्याने आत्तापर्यंत या सामन्यात 8 विकेट्स नावावर केले आहेत आणि एक मोठी कामगिरी केली आहे.
ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात, रबाडाने पहिल्या डावात ५१ धावा देत पाच विकेट्स घेतल्या. त्यानंतर, दुसऱ्या डावातही रबाडाचा कहर सुरूच राहिला आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्याने ११ षटकांत ४४ धावा देत तीन विकेट्स घेतल्या. रबाडाने दुसऱ्या डावात मार्नस लाबुशेन (२२), उस्मान ख्वाजा (६) आणि कॅमेरॉन ग्रीन यांचे बळी घेतले.
या काळात कागिसो रबाडाने एक अतिशय खास कामगिरी केली. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक विकेट घेणारा पाचवा गोलंदाज बनला. रबाडाने माजी दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलिसला मागे टाकून ही कामगिरी केली. ३० वर्षीय रबाडाने त्याच्या २४२ व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात ५७४ विकेट्स घेतल्या. त्याने जॅक कॅलिसला मागे टाकले, ज्यांनी ५१३ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५७२ विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याचा विक्रम शॉन पोलॉकच्या नावावर आहे. पोलॉकने ४१४ सामन्यांमध्ये ८२३ विकेट्स घेतल्या.
Kagiso Rabada, South African fast bowling royalty ⚡ 🇿🇦 pic.twitter.com/Uo18zTL09v
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 11, 2025
आज ऑस्ट्रेलीया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये फायनलच्या सामन्याचा तिसरा दिवस आज सुरु होणार आहे. या सामन्याचा दुसऱ्या डावाला कालपासुन सुरुवात झाली आहे. या सामन्यात दुसऱ्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने ८ विकेट्स गमावले आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे आज ऑस्ट्रेलीयाच्या संघासाठी आव्हान असणार आहे.