उस्मान ख्वाजा आणि कागिसो रबाडा(फोटो-सोशल मीडिया)
WTC Final 2025 : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना खेळवला जात आहे. सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंम्बा बवुमाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजी करत असून ऑस्ट्रेलियाची सुरवात चांगली झाली नाही. साऊथ आफ्रिकेचा वेगवान रबाडाने ऑस्ट्रेलियाला सुरवातीला दोन धक्के दिले. उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीन या दोघांना त्याने १६ धावांवर माघारी पाठवले. त्यात उस्मान ख्वाजा हा भोपळाही न फोडता माघारी परतला आहे. यासोबत त्याने एक नकोसा विक्रम केला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या जेतेपदाच्या पहिल्या दिवशी उस्मान ख्वाजाने आपल्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम केला आहे. आज जेतेपदाचा पहिला दिवस सुरू आहे. या दरम्यान, सलामीवीर उस्मान ख्वाजाने असा विक्रम केला जो आजपर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कधीही कुणी केलेला नाही.
हेही वाचा : ऐकावे ते नवलच! 500 पेक्षा अधिक महिलांसोबत शरीरसंबंध, वेस्ट इंडिजच्या ‘या’ गोलंदाजाचा आत्मचरित्रात खुलासा..
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच जेव्हा एखादा फलंदाज २० चेंडू खेळून देखील १ धावकाढू शकला नाही आणि शून्य धावांवर बाद झाला. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, २०२३ च्या सुरुवातीला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळवण्यात आला होता. त्यावेळी देखील उस्मान ख्वाजाने भारताविरुद्ध एकूण १० चेंडू खेळून तो शून्य धावांवर बाद झाला होता. आता या सामन्यात देखील ख्वाजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २० चेंडू खेळले पण त्याला एकही धाव काढता आली नाही. रबाडाने त्याला माघारी धाडले आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना लंडनमधील ऐतिहासिक मैदान लॉर्ड्सवर खेळवण्यात येत आहे. यादरम्यान, त्याने डॉन ब्रॅडमनचा एक खास विक्रम देखील मोडलाया आहे. खरंतर, डॉन ब्रॅडमनने लॉर्ड्सच्या मैदानावर एकूण ५५१ धावा केलेल्या होत्या. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये स्टीव्ह स्मिथने या मैदानावर ४० धावा काढताच ब्रॅडमनचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी स्टीव्ह स्मिथने लॉर्ड्सवर एकूण ५१२ धावा काढल्या होत्या. परंतु, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जेतेपदाच्या सामन्यात त्याने ४० धावा काढताच डॉन ब्रॅडमनचा ५५१ धावांचा टप्पा पार केला आहे. यानुसार, आता स्टीव्ह स्मिथ हा लॉर्ड्सवर डॉन ब्रॅडमनपेक्षा जास्त धावा काढणारा फलंदाज बनला आहे.
टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.