युवराज सिंगचा ४४ वा वाढदिवस(फोटो-सोशल मीडिया)
Yuvraj Singh celebrated his birthday with his family : माजी भारतीय अष्टपैलू आणि विश्वचषक विजेता खेळाडू युवराज सिंगने काल त्याचा ४४ वा वाढदिवस त्याच्या कुटुंबासोबत साजरा केला. या खास क्षणी त्याने पत्नी आणि मुलांसह केक कट केला. या समारंभात काही जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित दिसून आले. या खास प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
चाहते आणि माजी क्रिकेटपटूंकडून सोशल मीडियाद्वारे युवराजला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्याच्या आक्रमक फलंदाजी आणि उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखला जाणारे युवराज सिंग अजून देखील लाखो क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात घर करून आहे. चाहते त्याच्या कुटुंबासह घालवलेल्या या खाजगी क्षणाचे मनापासून कौतुक करताना दिसून येत आहेत.
युवराज सिंगला त्याच्या वाढदिवसापूर्वी एक महत्त्वपूर्ण सन्मान करण्यात आला आहे. त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी, ११ डिसेंबर रोजी, पंजाब क्रिकेट असोसिएशननकडून नवीन चंदीगडमधील मुल्लानपूर येथील नव्याने बांधलेल्या महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये त्याच्या नावाचा एक स्टँड ठेवण्यात आल. या कार्यक्रमात युवराज सिंग देखील उपस्थित होता.
युवराज सिंगने भारतासाठी ३०४ एकदिवसीय सामने खेळले असून यामध्ये त्याने ८७०१ धावा केल्या आहेत. तसेच त्याने १११ विकेट देखील घेतल्या आहेत. त्याने ५८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने ४० कसोटी सामन्यांमध्ये सुमारे ३४ च्या सरासरीने १९०० धावा फटकावल्या आहेत.
२०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात युवराज सिंगची कामगिरी ऐतिहासिक अशी राहिली आहे. त्याने या स्पर्धेत ३६२ धावा केल्या होत्या तसेच त्याने १५ गडी देखील बाद केले होते. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले होते. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत देशासाठी त्याने दिलेले योगदान क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रेरणादायी कथांपैकी एक कथा मानली जात आहे.
हेही वाचा : Under-19 Asia Cup: वैभवच्या विक्रमी शतकामुळे भारताने UAE ला लोळवले! 234 धावांनी मिळवला विजय
२००७ च्या टी-२० विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकामध्ये त्याने मारलेले सहा षटकार अजूनही देखील क्रिकेट चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असतो. १० जून २०१९ रोजी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर युवराज सिंग सामाजिक कार्य आणि व्यावसायिक कार्यात सक्रिय आहे.






