नवी दिल्ली – देशात प्रजासत्ताक दिनाचा दोन दिवसावर आलाय. भारतीय नौदलाच्या सैनिकांनीही दिल्लीत राजपथावर रिहर्सल करताना केली. या रिहर्सलदरम्यान भारतीय नौदलाचं संगितप्रेम पाहायला मिळालं. भारतीय नौदलाच्या सैनिकांनी पीरेडदरम्यान, भारतीय नौदलानं आपल्या परेडच्या रिहर्सलदरम्यान मोनिका, ओह्ह माय डार्लिंग, दुनिया में लोगोंको ही गाणी वाजवली. भारतीय नौदलाच्या सैनिकांनी छेडलेले हे वेगळे सूर आता सोशल मिडीयावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
देशात प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष सुरू झाला आहे. या वर्षी एक दिवस आधी म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून उत्सव सुरू झाला आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त फुल ड्रेस रिहर्सल सुरू असते. दिल्लीच्या कडाक्याच्या सकाळमध्येही ड्रेस रिहर्सल पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. भारतीय नौदलाच्या सैनिकांनीही दिल्लीत राजपथावर रिहर्सल करताना केली.या निमित्तानं नवी चर्चाही रंगली आहे. खरंतर सैन्य म्हटलं की फक्त देशभक्तीपर गाणींच आपल्या नजरेसमोर येतात. अशा नौदलाच्या सैनिकांच्या परेडच्या रिहर्सलदरम्यान चित्रपटाची गाणी वाजवली आहेत. मोनिका, ओह्ह माय डार्लिंग, दुनिया में लोगोंको या गाण्यावरून सैनिकांनी सर्वांत लक्ष वेधून घेतलं आहे. आणि आता यावरुनही चर्चांना उधाणा आले आहे. या गाण्याचा व्हिडीओ आता सगळ्याच सोशल मीडियावर ट्रेन्ड होऊ लागला आहे. या गाण्याचा व्हिडीओ आर्कस्केप्स नावाच्या युट्युब अकाऊंटवर 21 जानेवारी 2022 रोजी सगळ्यात आधी शेअर करण्यात आला होता. दरम्यान, ट्विटरवर अनेकांनी हे गाणं वाजवणाऱ्या सैनिकांच्या टॅलेंटचं कौतुक केलंय. तर काहींना मात्र ही बाब खटकली आहे. एकूणच काय तर भारतीय सैनिक ओह्ह माय डार्लिंगमुळे चर्चेत आले आहेत.आतापर्यंत लाखो लोक भारतीय नौदलाची या रिहर्सलचा व्हिडीओ पाहून झाली असून यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. अनेकांनी भारतीय सैनिकांचं हे संगितप्रेम भावलं आहे.
Indian Naval Band cheering our troops during interval period at Republic Day Parade Rehearsal.
You will watch it again and again for sure ??️♀️⚔️ Beautiful ❤️? pic.twitter.com/wxNkzKcVtl — Major Surendra Poonia (@MajorPoonia) January 23, 2022
[read_also content=”हॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाने केली आत्महत्या, सर्वत्र खळबळ https://www.navarashtra.com/world/hollywood-actress-son-commits-suicide-nrps-226675/”]