अनंत अंबानींच्या लग्नाची देशभर चर्चा होत आहे. यातील अनेक गोष्टी बऱ्याच व्हायरल झाल्या, यातीलच एक म्हणजे अनंत अंबानींनी गिफ्ट केलेले लग्झरी घड्याळ. तुम्हाला माहिती असेल तर, अनंत अंबानींनी आपल्या लग्नात काही सेलेब्रिटींना आणि आपल्या जिवलग मित्रांना 2 कोटींची घड्याळ भेट म्हणून दिली आहे. अनंत-राधिकाच्या शाही लग्नाचा थाट काही वेगळाच होता. भारतासह देशातील अनेक दिग्ग्ज व्यक्तींनी या सोहळ्यात आपली उपस्थिती दर्शवली.
या लग्नात पाहुण्यांची विशेष काळजी घेण्यात आली. तसेच रिटर्न गिफ्ट म्हणून अनंत अंबानीने त्याच्या मित्रांना खास भेट म्हणून 2 कोटींचे घड्याळ गिफ्ट केले. सध्या ही बातमी सोशल मीडियावर फार ट्रेंड होत आहे. अनंतने काही जिवलग मित्रांना ‘Audemars Piguet’ कंपनीचं घड्याळ गिफ्ट केलं आहे. त्याच्या मित्रांनी हा घड्याळ घालून याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आता अनेकांना प्रश्न पडत आहे की एवढ्या महागड्या फोनमध्ये नक्की इतकं काय खास आहे? यासाठीच आज आम्ही तुम्हाला या घड्याळाचे फीचर्स सांगत आहोत.
Audemars Piguet कंपनीच्या कारागिरांनी काही इनोव्हेटिव डिझायनची घड्याळ तयार केली आहेत. Audemars Piguet royal oak या घड्याळाचं लिमिटेड व्हर्जन अनंत अंबानींनी आपल्या मित्रांसाठी बनवून घेतलं होत. हे घड्याळ त्यांनी आपल्या 25 मित्रांसाठी रिटर्न गिफ्ट म्हणून खास बनवून घेतलं होत. मिळालेल्या माहितीनुसार, या घड्याळाची किंमत 2 कोटी इतकी आहे.