iPhone 17 Pro Max Vs Galaxy Z Fold 7: किसमें कितना है दम! जबरदस्त परफॉर्मंस आणि दमदार लूक, तुमच्यासाठी कोण बेस्ट?
iPhone 17 Pro Max आणि Samsung Galaxy Z Fold 7 ची सध्या मार्केटमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. जे लोकं नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. Apple ने लाँच केलेला iPhone 17 Pro Max खरेदी करावा की Samsung ने लाँच केलेला फ्लगशिप Fold सीरीजधील Z Fold 7 खरेदी करावा. आता आम्ही तुम्हाला दोन्ही स्मार्टफोन्सच्या फीचर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही ठरवू शकता, की तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन बेस्ट असणार आहे.
iPhone 17 Pro Max मध्ये 6.9 इंचाचा Super Retina XDR स्क्रीन देण्यात आली आहे, जी ProMotion टेक्नोलॉजी आणि 1Hz से 120Hz पर्यंत डायनामिक रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. यामध्ये 7-लेयर एंटी-रिफ्लेक्टिव कोटिंग देखील आहे, ज्यामुळे विजिबिलिटी अधिक चांगली होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
आयफोनशी तुलना करता, Galaxy Z Fold 7 मध्ये 8 इंच QXGA+ Dynamic AMOLED 2X इनफिनिटी फ्लेक्स डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 2600 निट्सपर्यंतची ब्राइटनेस आणि120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट ऑफर करते. या स्मार्टफोनच्या बाहेरील बाजूस 6.5 इंच फुल-HD+ कवर स्क्रीन देखील आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी या डिव्हाईसमध्ये Gorilla Glass Victus 2 आणि Ceramic Shield चा वापर करण्यात आला आहे.
प्रोसेसिंग पावरबद्दल बोलायचं झालं तर iPhone 17 Pro Max मध्ये A19 Pro Bionic चिपसेट दिला आहे, ज्यामध्ये हीट कंट्रोल करण्यासाठी वेपर कूलिंग चेंबर देण्यात आला आहे. तर Samsung Z Fold 7 मध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर दिला आहे. गेमिंग आणि CPU परफॉर्मेंसबाबतीत Fold 7 थोडा वेगळा आहे. पण आयफोनचा चिपसेट बॅटरी ऑप्टिमायझेशनमध्ये चांगला सिद्ध होऊ शकतो.
कॅमेरा सेटअपमध्ये देखील दोन्ही फोन पूर्णपणे वेगळा आहे. iPhone 17 Pro Max मध्ये 48MP चा ट्रिपल फ्यूजन कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामध्ये टेट्राप्रिज्म टेलीफोटो लेंस आहे, जो 8x ऑप्टिकल आणि 40x हाइब्रिड झूमला सपोर्ट करतो. हे अधिक चांगले पोर्ट्रेट, मॅक्रो आणि झूम फोटोग्राफीसाठी डिझाईन करण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला Galaxy Z Fold 7 मध्ये 200MP चा प्राइमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड आणि 10MP टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. याशिवाय आतील स्क्रीनवर 10MP कव्हर कॅमेरा आणि 10MP सेन्सर देखील आहे.
दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. Apple ने असा दावा केला आहे की, iPhone 17 Pro Max एकदा चार्ज केल्यानंतर 39 तासांचा बॅकअप देते. तर सॅमसंगचा Fold 7 नियमित वापरातही मजबूत बॅटरी बॅकअप देण्यास सक्षम आहे.
iPhone 17 Pro Max च्या 256GB व्हेरिअंटची किंमत 1,49,900 रुपयांपासून सुरु होतं. या आयफोनचा टॉप मॉडल (2TB) ची किंमत 2,29,900 रुपये आहे. Samsung Galaxy Z Fold 7 च्या 12GB/256GB मॉडेलची किंमत 1,74,999 रुपयांपासून सुरु होते आणि हाय-एंड व्हेरिअंटची किंमत 2,16,999 रुपये आहे.