फोटो सौजन्य -iStock
Apple ने Meta AI Llama चा प्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळे Apple वापरकर्त्यांना Meta AI चा वापर करता येणार नाही. Apple वापरकर्त्यांसाठी लवकरच Meta AI Llama उपलब्ध होणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. त्यामुळे Apple वापरकर्ते आतुरतेने Meta AI ची वाट बघत होते. पण आता Apple वापरकर्ते Meta AI Llama चा वापर करू शकत नाहीत. कारण Apple ने Meta AI Llama चा प्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळे Apple वापरकर्त्यांसाठी सध्या ChatGPT हा चॅटबॉट उपलब्ध आहे. Apple ने ChatGPT सोबत जून महिन्यातच करार केला आहे. लवकरच Apple त्यांच्या वापरकर्त्यांसाठी Gemini हा चॅटबोट देखील उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले जात आहे.
Apple त्यांच्या वापरकर्त्यांसाठी Meta AI उपलब्ध करून देणार होते. याबाबत Apple आणि Meta या दोन्ही कंपन्यांमध्ये मार्च महिन्यापासून बोलणी सुरु होती. मात्र आता Apple ने Meta AI Llama चा प्रस्ताव नाकारला आहे. Meta AI Llama ची गोपनीयता पातळी, हे Apple ने Meta चा प्रस्ताव नाकारण्यामागील कारण असल्याचे सांगितले जात आहे. Meta AI Llama ची गोपनीयता पातळी कमकुवत आहे, असे कारण Apple ने दिले आहे. यापूर्वी Apple ने Meta AI Llama वर टीका केली होती. त्यामुळे Apple ने Meta चा हा प्रस्ताव स्विकारला असता तर Meta AI Llama बाबत Apple ने आपली भुमिका बदलली, अशा चर्चा निर्माण होण्याची शक्यता होती. याच कारणांमुळे Apple ने Meta AI Llama चा प्रस्ताव नाकारल्याचे सांगितले जात आहे.
Apple ने ChatGPT सोबत जून महिन्यातच करार केला आहे. त्यानंतर आता लवकरच Apple त्यांच्या वापरकर्त्यांसाठी Gemini सोबत करार करणार असल्याचे सांगितले जात आहे. Apple ने आयोजित केलेल्या त्यांच्या वर्ल्डवाइड डेव्हलपर कॉन्फरन्स 2024 मध्ये ‘Apple Intelligence’ नावाची AI असिस्टंट लाँच केले होते. सध्या, Apple Intelligence केवळ iPhone 15 Pro आणि नंतरच्या मॉडेल्समध्येच उपलब्ध आहे.