फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन... सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना
एकीकडे फोल्डेबल फोन खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या वेगाने वाढत आहे तर दुसरीकडे हा फोन खरेदी केल्यानंतर त्रस्त असणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे असल्याचे पाहायला मिळत आहेत. फोल्डेबल फोन वापरणाऱ्या युजर्स ना अशा काही समस्यांच्या सामना करावा लागतो, ज्याबाबत सामान्य स्मार्टफोन युजर्स विचार देखील करू शकत नाहीत. तुम्ही देखील नवीन फोल्डेबल फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा फोन खरेदी केल्यानंतर तुम्हाला कोणत्या समस्यांच्या सामना करावा लागू शकतो याबाबत सर्वात आधी जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुम्ही कोणताही फोन खरेदी केला तरी त्याच्या बॅटरी लाईफबद्दल सतत चिंता असते. विशेषतः फोल्डेबल फोनच्या बाबतीत ही चिंता अधिक वाढते. फोल्डेबल फोनची डिझाईन पातळ असल्यामुळे यामध्ये जास्त मोठी बॅटरी दिली जाऊ शकत नाही. मात्र स्मार्टफोनची मोठी स्क्रीन वापरण्यासाठी जास्त बॅटरीची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत फोनमधील बॅटरी वारंवार चार्ज करण्याची गरज पडते.
हिंजच्या टिकाऊपणाबद्दल फोल्डेबल फोन्सना सुरुवातीपासूनच संघर्ष करावा लागला आहे. मात्र अद्याप ही समस्या सोडवलेली नाही. समोर आलेल्या काही रिपोर्टनुसार फोल्डेबल फोनच्या वापरानंतर काही काळाने फोनमधील हिंज सैल होतात. तसेच अनेक युजरचे असे म्हणणे आहे की, जर हिंजवर धूळ साचली तर ते योग्य प्रकारे काम करत नाहीत.
फोल्डेबल फोनची जास्तीची लांबी आणि आस्पेक्ट रेशिओमुळे ॲप्स आणि फोटो-व्हिडिओसोबत सुसंगततेची समस्या निर्माण होते. फोल्डेबल फोनची एक मोठी हायलाईट त्याची मोठी स्क्रीन देखील असते. पण या फीचरचा पूर्णपणे वापर केला जात नाही. व्हिडीओ पाहताना स्क्रिनवर बरीच जागा रिकामी राहते. याव्यतिरिक्त, बिजागरीच्या ठिकाणी एक घडी किंवा रेषा दिसून येते, ज्यामुळे व्हिडीओ पाहण्याचा अनुभव प्रभावित होतो. काहींना स्क्रोलिंग करतानाही यामुळे अडचण जाणवते.
फोल्डेबल फोनची स्क्रीन डॅमेज होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. या फोनची स्क्रीन सामान्य स्मार्टफनपेक्षा अधिक सॉफ्ट आणि नाजूक असते, जी पडल्यावर डॅमेज होऊ शकते. नुकसान होऊ नये यामुळे अनेक कंपन्या स्क्रीनवर प्लास्टिक स्क्रीन प्रोटेक्टर देखील लावतात. मात्र काही वेळाने या प्रोटेक्टरमध्ये बबल दिसू लागतात. सामान्य फोनच्या तुलनेत, फोल्डेबल फोनवरील स्क्रीन प्रोटेक्टर्स जास्त काळ टिकत नाहीत.






