लोकप्रिय ऑनलाईन प्लॅटफॉर्म्समध्ये एक्सचे नाव आवर्जून येते. गेल्या अनेक दिवसांपासून एक्स चर्चेत होता त्यातच आता याच्याशी निगडित एक नवीन अपडेट समोर आली आहे. एलोन मस्क लवकरच X प्लॅटफॉर्मवर ऑडिओ- व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूल्स सादर करणार आहे. मेटाच्या व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉलिंग फीचरही खूप लोकप्रिय आहे, त्यामुळे X च्या या नवीन फीचरमुळे व्हॉट्सॲपची चिंता वाढणार असल्याचे दिसून येत आहे. कंपनी एका नवीन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूलवर काम करत असल्याची माहिती आहे जी युजर्स प्लॅटफॉर्मवर कनेक्ट होण्याचा मार्ग लक्षणीयरीत्या वाढवू शकतात.
मस्क यांच्या नेतृत्वातील X लवकरच वापरकर्त्यांसाठी आपला मोबाइल नंबर शेअर न करताच त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्यांशी कॉलवर कनेक्ट होण्याची परवानगी देणार आहे. याबाबत स्वतः एलॉन मस्क यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत माहिती दिली आहे. पोस्टमध्ये मास्क यांनी लिहिले आहे की, “लवकरच व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल्स X वर येत आहेत. हे फिचर iOS, Android, Mac आणि PC वर काम करेल. फोन नंबरची आवश्यकता नाही. X हे प्रभावी अॅड्रेस बुक आहे.”
हेदेखील वाचा – अंबानींची भेट! Jio सेटअप बॉक्सवर 800 हून अधिक टीव्ही चॅनेल फ्रीमध्ये मिळणार
माहितीनुसार, नवीन फिचर डायरेक्ट मेसेज (DM) मेनूमध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच नवीन व्हिडिओ कॉलिंगच पर्याय वरील बाजूस उजव्या कोपऱ्यात उपलब्ध असेलनवीन DM ची रचना फेसबुक मेसेंजर आणि WhatsApp सारख्या इतर प्लॅटफॉर्म सारखीच करण्यात येईल. दरम्यान याआधी X च्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी CNBC ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या बातमीची पुष्टी केली. त्या म्हणाल्या, नवीन फीचरचे उद्देश ”प्लॅटफॉर्मवर संवाद वाढवणे” आणि ”युजर्सना एकमेकांसह कनेक्ट होण्यासाठी अधिक पर्याय देणे” हे आहे.
Video & audio calls coming to X:
– Works on iOS, Android, Mac & PC
– No phone number needed
– X is the effective global address bookThat set of factors is unique.
— Elon Musk (@elonmusk) August 31, 2023
हेदेखील वाचा – अनलिमिटेड डेटा कॉलिंगवाला रिचार्ज प्लॅन बंद होणार? टेलिकॉम कंपन्यांनी TRAI’ला काय सांगितले…
X मधील डिझाइन इंजिनिअर Andrea Conway यांनी ट्विटरवर नवीन DM मेनूचा एक फोटो देखील शेअर केला आहे. ज्यात व्हिडीओ कॉलिंग पर्याय दिसत आहे. हा पर्याय मेनूच्या वरील उजव्या कोपऱ्यात टेक्स्ट मेसेज, फोटो आणि व्हिडीओ पाठवण्याच्या इतर पर्यायांच्या बाजूला दिसून येत आहे. दरम्यान हे फिचर नक्की कोणत्या दिवशी दिवशी लाँच होईल, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.