दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. यामुळे वारंवार अपचन आणि ऍसिडिटी होऊन आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते. त्यामुळे आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. शरीरात जमा झालेल्या विषारी घाणीमुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांच्या सेवनामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल. (फोटो सौजन्य – istock)
शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित करा 'या' फळांचे सेवन

सफरचंदांमध्ये विरघळणारे फायबर पेक्टिन असतात. ज्यामुळे आतड्यांमधील घाण सहज बाहेर पडून जाते. यासोबतच रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी मदत करते.

पपईमध्ये पपेन नावाचे एंजाइम असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. वारंवार पचनाच्या समस्या उद्भवत असतील तर सकाळच्या नाश्त्यात वाटीभर पपई खावी. यामुळे बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळेल.

किवीमध्ये फायबर आणि विटामिन सी असल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासोबतच त्वचेवर सुद्धा चमकदार ग्लो येतो. आतडे स्वच्छ करण्यासाठी किवीचे सेवन करावे.

पेरूमध्ये फायबर आणि विटामिन सी असते, यामुळे पचनसंस्था मजबूत होते. पोट स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर पेरूचे सेवन करावे. याशिवाय पेरूच्या पानांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील.

डाळिंबाचा रस रक्त शुद्ध करून शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतो. तसेच शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी डाळिंबाच्या दाण्यांचे सेवन करावे.






