BSNL ने बाजी मारली! जिओ आणि स्टारलिंकला मागे टाकत लाँच केली सॅटेलाइट कनेक्टिविटी
एलन मस्कची सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंक भारतात लाँच करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. यासाठी स्टारलिंकने दूरसंचार विभागाच्या सर्व अटी देखील मान्य केल्या आहेत. त्यामुळे स्टारलिंक सेवा भारतात सुरु केली जाऊ शकते. मात्र स्टारलिंकच्या भारतातील एंट्रीने Jio, Airtel आणि Vodafone Idea नाराजी व्यक्त केली होती. ही सर्व चर्चा सुरु असतानाच आता BSNL ने बाजी मारली आहे.
BSNL ने Direct to Device Satellite म्हणजेच सॅटेलाइट कनेक्टिविटी सर्विस लाँच केली आहे. ही भारतातील पहिली सॅटेलाइट कनेक्टिविटी सर्विस आहे. आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आणि स्टारलिंकच्या चर्चा सुरु असताानाच सरकारी टेलिकॉम कंपनीने बाजी मारली आहे. बीएसएनएलने सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी सुरू केली आहे. इतकंच नाही तर यासोबत काही फीचर्स देखील देण्यात आले आहेत जे इतर कंपन्यांसाठी फक्त एक स्वप्न आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
स्टारलिंकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
BSNL ने डायरेक्ट-टू-डिव्हाइस सॅटेलाइट सेवा सुरू केली आहे. असे करणारी ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. बीएसएनएलने यासाठी अमेरिकन कंपनी Viasat सोबत हातमिळवणी केली आहे. या सेवेची सर्वात खास गोष्ट म्हणजे यूजर्स मोबाईल नेटवर्क आणि वायफायशिवाय एसएमएस पाठवू शकणार आहेत.
BSNL launches India’s 1st Satellite-to-Device service!
Seamless connectivity now reaches India’s remotest corners. pic.twitter.com/diNKjaivFo
— DoT India (@DoT_India) November 13, 2024
आता युजर्सना मोबाईल टॉवर आणि वायफायचा त्रास सहन करावा नाही. पृथ्वीपासून 36,000 किलोमीटर उंचीवर लटकलेल्या सॅटेलाईटवरून सर्व कम्यूनिकेशन होणार आहे. त्याचा सर्वाधिक फायदा देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना होणार आहे. जिथे आजही मोबाईल नेटवर्क आणि वायफाय उपलब्ध नाही. केवळ दुर्गम जंगले आणि उंच पर्वतांमध्ये राहणाऱ्या लोकांनाच नाही, तर प्रवास करणाऱ्या आणि गिर्यारोहण करणाऱ्यांनाही बीएसएनलची ही नवीन सर्विस फायदेशार ठरणार आहे.
बीएसएनएलसंंबंधित बातम्या वाचण्यााठी इथे क्लिक करा
Apple ने iPhone 14 सह इमरजेंसी सर्विस लाँच केली, ज्यामध्ये वापरकर्ते आपत्कालीन परिस्थितीत सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीद्वारे SOS संदेश पाठवू शकतात. पण बीएसएनएलने एक पाऊल पुढे टाकत दैनंदिन वापरासाठीही ही सेवा सुरू केली आहे. डायरेक्ट-टू-डिव्हाइस सेवेसाठी बीएसएनएलने अमेरिकन कंपनी Viasat सोबत भागीदारी केली आहे.
BSNL ने अद्याप त्यांच्या फी आणि प्लॅन्सबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु त्यांनी त्यांच्या दोन अतिशय उपयुक्त फीचर्सबद्दल निश्चितपणे सांगितले आहे. सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीच्या मदतीने वापरकर्ते सामान्य एसएमएस पाठवू शकतील. म्हणजेच तुमचा मेसेज सॅटेलाइटच्या माध्यमातून दुसऱ्या युजरपर्यंत जाईल आणि त्याच मार्गाने त्याचा मेसेजही तुमच्यापर्यंत पोहोचेल. यासोबतच UPI पेमेंटचीही व्यवस्था करण्यात आली आहे. वैशिष्ट्यांच्या बाबतीत, BSNL ने Jio आणि Elon Musk च्या Starlink ला मागे टाकले आहे.