Republic Day 2026: BSNL चा रिपब्लिक डे धमाका! यूजर्सना दिलं मोठं गिफ्ट, इतक्या किंमतीत मिळणार वर्षभराची व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी Google ने सादर केलं स्पेशल डूडल, ISRO च्या कामगिरींनी वेधलं लक्ष
कंपनीने लाँच केलेल्या या वर्षभराची व्हॅलिडीटी असलेल्या रिचार्ज प्लॅनची किंमत 2626 रुपये आहे. म्हणजेच दररोज या प्लॅनसाठी 7.19 रुपये खर्च करावे लागणार आहेत. 2626 रुपयांच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 2.6 जीबी डेटा ऑफर केला जाणार आहे. म्हणजेच संपूर्ण वर्षासाठी या प्लॅनमध्ये 949 जीबी डेटा मिळणार आहे. डेली 2.6 जीबी डेटा संपल्यानंतर 40 Kbps च्या स्पीडने डेटा मिळणार आहे. भारत कनेक्ट 2626 रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ऑफर केली जात आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 100 SMS (एसएमएस) मिळणार आहे आणि यासाठी कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही. या प्लॅनची व्हॅलिडीटी 365 दिवसांची म्हणजेच संपूर्ण वर्षभराची आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Celebrate the spirit of the Republic day with BSNL Bharat Connect 26 plan! One recharge that delivers a full year of trusted, swadeshi connectivity with unlimited calls, 2.6 GB/day data, 100 SMS/day, and 365 days of uninterrupted validity.#BharatConnect26 #RepublicDaySpecial… pic.twitter.com/ADKCTkq5CD — BSNL India (@BSNLCorporate) January 25, 2026
बीएसएनएल सध्या यूजर्सना दोन अॅन्यूअल रिचार्ज प्लॅन ऑफर करतो. तर आता 2626 रुपयांच्या प्लॅनसह ही संख्या तीन प्लॅन्सची झाली आहे. या तिन्ही रिचार्ज प्लॅन्समध्ये कंपनी 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करते. बीएसएनएलच्या आणखी 2 वार्षिक प्लॅनबद्दल जाणून घ्या जे 365 दिवसांची व्हॅलिडीटी आणि चांगले डेटा, कॉलिंग आणि मेसेजिंग फायदे देतात.
कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये देखील 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह रोज 2.5 जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगच्या फायद्यांसह 100 एसएमएस ऑफर केला जातो. डेली 2.5 जीबी डेटा संपल्यानंतर 40 Kbps च्या स्पीडने डेटा मिळणार आहे.
कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये देखील 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह रोज 3 जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगच्या फायद्यांसह 100 एसएमएस ऑफर केला जातो. डेली 3 जीबी डेटा संपल्यानंतर 40 Kbps च्या स्पीडने डेटा मिळणार आहे.






