Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी Google ने सादर केलं स्पेशल डूडल, ISRO च्या कामगिरींनी वेधलं लक्ष
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने एक स्पेशल डूडल सादर केलं आहे. हे डूडल स्पेस थीमवर आधारित आहे. यामध्ये सॅटेलाइट, ऑर्बिट आणि अंतराळासंबंधित अनेक घटक ‘GOOGLE’ शब्दाच्या अक्षरांत अतिशय आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आले आहेत. हे डूडल ISRO चे मिशन आणि भारताच्या अंतराळ यात्रांची एक झलक दाखवते. प्रजासत्ताक दिनानिमित्त सादर करण्यात आलेल्या डूडलमध्ये कोणत्या अंतराळ यात्रा दर्शवण्यात आल्या आहेत, याबाबत गुगलने अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलं नाही. (फोटो सौजन्य – Google)
गूगलने सादर केलेल्या या डूडलला ISRO च्या मोठ्या आणि महत्वाकांक्षी मिशनसोबत जोडले जात आहे. यामध्ये गगनयान आणि चंद्रयान सारखे मिशन समाविष्ट असल्याचे सांगितलं जात आहे, ज्यामुळे भारताच्या अंतराक्ष क्षेत्राला एक नवीन ओळख मिळाली. गुगलचे हे खास डूडल ISRO चे यशस्वी वर्ष साजरे करते, ज्यामध्ये भारताने अंतराळ तंत्रज्ञानात अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. तसेच ISRO येणाऱ्या काळात अनेक मोठ्या कामगिरी आणि मिशन पूर्ण करण्यासाठी तयारी करत आहे.
गेल्या वर्षीच्या गुगल डूडलबद्दल बोलायचं झालं तर, गुगलने एक रंगीत आणि प्राण्यांच्या थीमवर आधारित डूडल तयार केले. हे डूडल पुण्यातील कलाकार रोहन दहोत्रेने डिझाईन केले होते. या डूडलमध्ये भारताच्या वेगवेगळ्या भागांचे प्रतिनिधित्व करणारे प्राणी दर्शवण्यात आले होते. जसे की, उडणारा मोर, मगर, पारंपारिक लडाखी पोशाखातला हिम बिबट्या, ढोल वाजवणारा वाघ आणि काळवीट.
चार्जिंग करताना फोन फुटला! Samsung Galaxy S25+ प्रकरणाने सोशल मीडियावर खळबळ, कंपनीने दिलं स्पष्टीकरण
गुगलचे पहिले डूडल 1998 साली तयार करण्यात आले होते. हा एक साधारण आउट-ऑफ-ऑफिस मेसेज होता, जो गुगलचे संस्थापक बर्निंग मॅन फेस्टिव्हलमध्ये असल्याचे दर्शवत होता. गेल्या 28 वर्षांत, गुगलने जगभरातील संस्कृती, इतिहास आणि विशेष प्रसंग साजरे करणारे 5,000 हून अधिक डूडल तयार केले आहेत.






