iPhone Upadet: आयफोन यूजर्सना Apple ने दिलं खास ख्रिसमस गिफ्ट, नव्या अपडेटमध्ये मिळणार सर्वात हटके फीचर्स, जाणून घ्या सविस्तर
हे अपडेट 2019 नंतर लाँच करण्यात आलेल्या सर्व मॉडेल्ससाठी जारी करण्यात आले आहे. यामध्ये iPhone 11 सीरीज, दूसरी आणि तीसरी जनरेशनमधील आयफोन एसई आणि नवीनतम आयफोन 17 सिरीज समाविष्ट आहेत. नवीन अपडेट इंस्टॉल करण्यासाठी सर्वात आधी तुमचा आयफोन ओपन करा आणि त्यानंतर सेटिंग पर्याय निवडा, जनरल पर्याय सिलेक्ट करा आणि सॉफ्टवेअर अपडेट सिलेक्ट करा. यानंतर डाऊनलोड आणि इंस्टॉलवर क्लिक करा. अपडेट दरम्यान, शक्य असल्यास तुमचा फोन वाय-फायशी कनेक्ट केलेला ठेवा आणि बॅटरी पूर्णपणे चार्ज केलेली ठेवा. (फोटो सौजन्य – Pinterest)
लिक्विड ग्लास लॉक स्क्रीन स्लायडर: या नवीन अपडेटसह आता तुम्ही लॉक स्क्रीनवर टाइम आणि वॉलपेपरची ट्रांसपेरेंसी तुमच्या पसंतीनुसार एडजस्ट करू शकणार आहात. ज्यामुळे यूजर्सचा व्युइंग एक्सपीरियंस अधिक चांगला होणार आहे.
इंनहान्स सेफ्टी अलर्ट्स: नवीन अपडेटमध्ये तुम्हाला रिअल टाईममध्ये हवामान अंदाज, आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थिती चेतावणी नकाशे आणि अधिकृत लिंक्ससह प्रदर्शित केल्या जातील.
ऑफाईलन लिरीक्स इन अॅपल म्युझिक: जर तुम्ही गाणी ऐकण्यासाठी अॅपल म्युझिकचा वापर करत असाल, तर तुम्ही इंटरनेटशिवाय देखील अॅपल म्युझिकमध्ये गाण्यांचे लिरिक्स पाहू शकणार आहात. एवढेच नाही तर आता तुमची आवडती प्लेलिस्ट म्युझिक अॅपच्या होम टॅबवर देखील दिसेल.
ऑटो चॅप्टर्स इन पॉडकास्ट: मोठे एपिसोड आपल्या हिशोबाने वाटले जाऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही थेट तुमच्या आवडत्या भागावर जाऊ शकता.
लिंक पॉडकास्ट रिकमेंडशन: जर तुम्ही मोठे पॉडकास्ट एपिसोड पाहत असाल, तर नवीन अपडेट आता तुम्हाला सेक्शनमध्ये विभागलेला पॉडकास्ट दाखवेल, ज्यामुळे तुम्हाला स्वारस्य असलेल्या विभागात त्वरित जाता येईल. जर पॉडकास्टमध्ये दुसऱ्या शोचा उल्लेख असेल, तर तुम्हाला त्याची थेट लिंक देखील मिळेल.
अॅडव्हान्स गेम लायब्ररी फिल्टर्स: Apple ने या नवीन अपडेटसह गेमिंग लाइब्रेरी अधिक चांगली केली आहे. Backbone आणि Razer Controls सह गेमिंग अधिक स्मूद होणार आहे.
Ans: प्रीमियम डिझाइन, शक्तिशाली प्रोसेसर, कॅमेरा क्वालिटी, सिक्युरिटी आणि दीर्घकाळ अपडेट सपोर्ट यामुळे आयफोनची किंमत जास्त असते.
Ans: साधारणपणे 5 ते 6 वर्षे iOS अपडेट्स आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळतात.
Ans: आयफोनचा कॅमेरा Natural Color, Video Stabilization, Cinematic Mode आणि प्रो-लेव्हल व्हिडिओसाठी प्रसिद्ध आहे.






