Canva down: फोटो - व्हिडीओ एडीटींग अॅप Canva डाऊन! युजर्स वैतागले, मिम्स व्हायरल
सर्वात लोकप्रिय डिझाइन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेला कॅनव्हा आता डाऊन झाला आहे. युजर्सना कॅनव्हाचा वापर करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे युजर्स निराश झाले आहेत. ऑनलाइन आउटेज मॉनिटरिंग साइट डाउनडिटेक्टरच्या मते, सुमारे 400 तक्रारी आधीच आल्या आहेत आणि ही संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. कॅनव्हामध्ये फोटो एडीट करताना युजर्सना अनेक अडचणी येत आहेत.
फोटो एडिटिंग अॅप कॅनव्हा आज म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास डाऊन झाला. अनेक ठिकाणी फोटो आणि व्हिडीओ एडीटींगसाठी कॅनव्हाचा वापर केला जातो. मात्र कॅनव्हा अचानक डाऊन झाल्याने युजर्सना अनेक अडचणी येत आहेत. आज सकाळपासून युजर्सना अॅप अॅक्सेस करण्यात अडचण येत आहे. युजर्स अॅपमध्ये लॉग इन करू शकत नाहीत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर युजर्स याबद्दल तक्रार करत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
युजर्स प्रामुख्याने ईमेज आणि फाइल्स अपलोड करताना समस्या नोंदवत आहेत, ज्यामुळे डिझाइन आणि प्रोजेक्ट पूर्ण करणे कठीण होत आहे. या आउटेजचा परिणाम जगभरातील युजर्सवर होत असल्याचे दिसून येत आहे आणि अनेकांनी त्यांची निराशा शेअर करण्यासाठी आणि अपडेट्स शोधण्यासाठी X कडे वळले आहे. फोटो अपलोड करताना आणि एडीट करताना विशेष समस्या नोंदवल्या जात आहेत. कॅनव्हा हे निर्माते, व्यवसाय आणि विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम टूल असल्याने, अशा कोणत्याही व्यत्ययामुळे वर्कफ्लोमध्ये विलंब होऊ शकतो. कंपनीने अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. त्यामुळे युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.
Me running to X to check if Canva is down because I can’t upload a photo pic.twitter.com/rmc7ajhb6G
— PriceShop Malaysia (@PriceShopMY) February 25, 2025
canva going down when i had one last thing to add pic.twitter.com/CVxhmK4BUh
— baz 𖤐⭒๋࣭ ⭑|| mcr tampa !!! (@_twilymp3) February 25, 2025
Canva down? Not on my bingo card today. pic.twitter.com/0jrPXdA5aq
— Jame. (@saorscaim) February 25, 2025
Canva down? Guess I am FORCED to take a long lunch break😅🥲😏 pic.twitter.com/ghCZKovXCU
— WeirdKaya (@WeirdKayaMY) February 25, 2025
डाउनडिटेक्टर नावाच्या आउटेज ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, 972 युजर्सना कॅनव्हा वापरताना समस्या येत आहेत. आम्ही कॅनव्हा अॅप वापरण्याचा प्रयत्नही केला, पण आम्हालाही लॉग इन करता आले नाही. ही समस्या केवळ भारतातच नाही तर अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि इतर देशांमध्येही दिसून येत आहे. त्यामुळे कॅनव्हाचा वापर करणारे जगभरातील युजर्स प्रतंड वैतागले आहेत.
Oppo Smartphone launch: जगातील सर्वात पातळ फोल्डेबल फोन लाँच, किंमत वाचून तुमचेही डोळे पाणावतील
मंगळवार, 25 फेब्रुवारी रोजी सकाळी ही समस्या उघडकीस आली आणि त्यानंतर तक्रारींची संख्या झपाट्याने वाढली. डाउनडिटेक्टरच्या मते, सुमारे 56 % युजर्सना वेबसाइटमध्ये समस्या येत आहेत, तर 44% युजर्सना मोबाइल अॅपमध्ये समस्या येत आहेत. त्यामुळे कंपनीने लवकरात लवकर ही समस्या सोडवावी, अशी मागणी आता युजर्सकडून केली जात आहे. शिवाय युजर्सनी कॅनव्हासाठी पर्याय शोधण्यास देखील सुरुवात केली आहे. युजर्स पिक्सआर्ट आणि पेंटसारख्या टूल्सचा वापर करू लागले आहेत.