काय सांगता! ChatGPT च्या Free Ghibli-स्टाईल ट्रेंडने उडवली इतर AI कंपन्यांची झोप, 1 तासात जोडले तब्बल इतके लाख युजर्स
जगातील पहिला AI चॅटबोट म्हणजे ओपनएआयचा ChatGPT. ओपनएआयने ChatGPT लाँच केल्यानंतर अनेक कंपन्यांनी त्यांचे वेगवेगळे AI लाँच केले. कोणी फ्री युजर्ससाठी AI लाँच केला, तर कोणी पेड युजर्ससाठी AI लाँच केला. बघता बघता, प्रत्येक कंपनीने त्यांचा स्वत:चा AI चॅटबोट रोलआऊट केला आणि जगातील पहिल्या AI चॅटबोटसाठी कठीण स्पर्धा निर्माण झाली. असं देखील सांगितंल जात आहे की, ChatGPT आपल्या स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल करण्यापेक्षा लोकं स्मार्टफोनमध्ये बिल्ड असलेल्या गुगलच्या जेमिनीचा आणि मेटा AI चा वापर करू लागली.
Instagram रिल्स लाईक करा आणि कमवा हजारो रुपये; सुरु झाला नवा स्कॅम, महिलेला घातला लाखोंचा गंडा
पण आता संपूर्ण परिस्थिती पलटली आहे. गेल्या आठडाभरात ChatGPT ने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. ChatGPT ने केवळ एका तासात तब्बल 10 लाख नवीन युजर्स जोडले आहेत. हे सर्व शक्य झाले आहे, Ghibli मुळे. कंपनीने त्यांच्या पेड आणि फ्री युजर्ससाठी Ghibli स्टाईल ईमेजचे फीचर सुरु केलं. एका रात्रीत हे फीचर प्रचंड लोकप्रिय झाले. आपले फोटो Ghibli स्टाईलमध्ये रुपांतरित करण्यासाठी लोकं ChatGPT मध्ये लॉगिन करू लागली. अशा प्रकारे ज्या AI कडे दुर्लक्ष केलं जात होतं, त्यानेच सर्वांची झोप उडवली. कंपनीने अगदी 1 तासातच 10 लाख नवीन युजर्स जोडले. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी ही कामगिरी जाहीर केली आणि ही आतापर्यंतची सर्वात अभूतपूर्व आणि जलद युजर्स वाढ असल्याचं म्हटले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ChatGPT मध्ये Ghibli-शैलीतील प्रतिमा जनरेटर आता विनामूल्य युजर्ससाठी देखील उपलब्ध आहे. पूर्वी हे फीचर फक्त पेड सबस्क्राइबर्ससाठी होते, परंतु 29 मार्चपासून ते सर्व युजर्ससाठी सुरु करण्यात आले. या वैशिष्ट्याद्वारे, युजर्स त्यांचे फोटो स्टुडिओ Ghibli च्या प्रसिद्ध अॅनिमेशनमध्ये रूपांतरित करू शकतात. कंपनीने हे फीचर सुरु करताच अगदी काही क्षणातच ते लोकप्रिय झाले.
सॅम ऑल्टमन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, ’26 महिन्यांपूर्वी जेव्हा चॅटजीपीटी लाँच करण्यात आले तेव्हा ते सर्वात व्हायरल इव्हेंटपैकी एक होते. तेव्हा आम्ही 5 दिवसांतच 10 लाख युजर्स जोडले होते. आत्ताच विचार केला तर आता केवळ 1 तासातच आम्ही 10 लाख युजर्स जोडले आहेत.’
the chatgpt launch 26 months ago was one of the craziest viral moments i’d ever seen, and we added one million users in five days. we added one million users in the last hour. — Sam Altman (@sama) March 31, 2025
मोफत Ghibli-शैलीतील इमेज जनरेटर लाँच झाल्यानंतर चॅटजीपीटीची लोकप्रियता आणखी वाढली आहे. यावरून हे स्पष्ट होते की AI-चालित सर्जनशील साधनांची मागणी वेगाने वाढत आहे. तथापि, या वैशिष्ट्याच्या वाढत्या मागणीमुळे ओपनएआयच्या सर्व्हरवर मोठा भार पडत आहे, ज्यामुळे ऑल्टमन युजर्सना ‘थोडा वेग कमी करण्याची आणि कमी प्रतिमा निर्माण करण्याची’ विनंती करत आहे. यासंबंधित त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट देखील शेअर केली होती.