Flipkart GOAT Sale 2025: या स्मार्टफोनवर सुरू आहेत धमाकेदार ऑफर्स, कमी किमतीत खरेदी करा ब्रँडेड डिव्हाईस
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टचा 2025 मधील सर्वात मोठा सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना कमी किंमतीत अनेक नवीन डिव्हाईस खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्यासाठी किंवा इतर कोणासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर दुसरी सुवर्णसंधी नाही. फ्लिपकार्टवर सुरू झालेला Goat सेल 17 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.
या लिस्टमध्ये मोटोरोला, सॅमसंग, रियलमी, वीवो, ओप्पोसह अनेक मोठ्या कंपन्यांच्या स्मार्टफोनचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लिस्टमध्ये अनेकांचा ड्रीम फोन आयफोन देखील आहे. तुम्हाला या सर्व स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठं डिस्काउंट ऑफर केलं जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Motorola moto g85 (8GB): खरं तर कंपनीने हा स्मार्टफोन 20,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता, मात्र आता हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट सेलमध्ये केवळ 14,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
Realme P3 5G (8GB) : या स्मार्टफोनची लाँच प्राइज 16,999 रुपये आहे, मात्र ऑफर्स आणि डिस्काउंटसह फोन सेलमध्ये 15,499 रुपयांना उपलब्ध आहे.
Samsung Galaxy S24 FE : कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनची किंमत 50,999 रुपये आहे, मात्र आता हा स्मार्टफोन 35,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे.
Realme P3X 5G (6GB) : या स्मार्टफोनची लाँच किंमत 16,999 रुपये आहे, मात्र सेलमध्ये फोनची किंमत 11,699 रुपये झाली आहे.
Vivo T4 Lite 5G : हा स्मार्टफोन 13,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता, मात्र सेलमध्ये फोनवर अनेक ऑफर उपलब्ध आहे, ज्यामुळे या डिव्हाईसची किंमत 9,999 रुपये झाली आहे.
Motorola moto g45 (8GB) : या स्मार्टफोनची ऑरिजिनल प्राइस 14,999 रुपये आहे, मात्र त्याची ऑफर प्राइस 10,999 रुपये झाली आहे.
Oppo K13x 5G : हा फोन कंपनीने 16,999 रुपयांना लाँच केला होता, मात्र आता सेलमधे त्याची किंमत 11,499 रुपये झाली आहे.
Samsung Galaxy A35 5G : हा फोन कंपनीने 36,999 रुपयांना लाँच केला होता, मात्र ऑफर्स आणि डिस्काउंटसह त्याची किंमत 19,999 रुपये झाली आहे
POCO C75 5G : या स्मार्टफोनची ऑरिजिनल प्राइस 10,999 रुपये असून, त्याची ऑफर प्राइस 7,499 रुपये झाली आहे
Realme C61 (4GB) : हा स्मार्टफोन कंपनीने 10,999 रुपयांना लाँच केला होता, मात्र आता त्यांची किंमत 7,699 रुपये झाली आहे
Samsung Galaxy F06 : या स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपये असली तरी त्याची ऑफर प्राइस 7,999 रुपये आहे
Infinix Note 50s 5G (6GB) : या स्मार्टफोनची ऑरिजिनल प्राइस 19,999 रुपये असली तरी फ्लिपकार्ट सेलमध्ये त्याची किंमत 12,249 रुपये झाली आहे.
POCO C71 : या स्मार्टफोनची ऑरिजिनल प्राइस 8,999 रुपये असली तरी ऑफर आणि डिस्काऊंटसह फोन 6,399 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो
Apple iPhone 15 : अनेकांचा ड्रीम स्मार्टफोन असलेला हा आयफोन 69,900 रुपयांना लाँच करण्यात आलं होता, मात्र आता सेलमध्ये त्याची किंमत 62,900 रुपये झाली आहे
Motorola moto g35 5G (12GB RAM) : हा स्मार्टफोन कंपनीने 12,499 रुपयांना लाँच केला होता. मात्र आता या फोनची किंमत सेलमध्ये 9,999 रुपये झाली आहे.