• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Follow These Steps Of Cyber Security Experts To Stay Safe From Fake Apps

बनावट ॲप्सपासून सुरक्षित राहण्यासाठी सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या ‘या’ टीप्स फॉलो करा

बनावट ॲप्सचा वापर करून लोकांची फसवूणक करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये देखील वाढ झालेली आहे. सायबर गुन्हेगार अत्यंत हुशारीने विश्वासार्ह ॲप्सची नक्कल करतात आणि बनावट ॲप्स बनवतात. या बनावट ॲप्सपासून सुरक्षित राहण्यासाठी सायबर सुरक्षा तज्ज्ञांकडून काही टीप्स शेअर करण्यात आल्या आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 23, 2024 | 03:48 PM
फोटो सौजन्य -iStock

फोटो सौजन्य -iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या स्मार्टफोनच्या काळात मोबाईल ॲप्सचा वापर अगदी आवश्यक झाला आहे. संवाद, करमणूक आणि उत्पादकता सगळ्यासाठी मोबाईल ॲप्सचा वापर केला जातो. पण या सगळ्यासोबत एक धोका देखील निर्माण होत आहे. तो म्हणजे बनावट ॲप्सचा. बनावट ॲप्सचा वापर करून लोकांची फसवूणक करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये देखील वाढ झालेली आहे. सायबर गुन्हेगार अत्यंत हुशारीने विश्वासार्ह ॲप्सची नक्कल करतात आणि बनावट ॲप्स बनवतात. यामुळे युजरची गोपनीयता आणि सुरक्षितता धोक्यात येते. तसेच डेटा चोरी आणि आर्थिक नुकसानीचाही धोका असतो. बनावट ॲपचे परिणाम व्यक्ती आणि व्यवसायांसाठी अत्यंत गंभीर असू शकतात.

हेदेखील वाचा – Union Budget App: सरकारच्या या अ‍ॅपवर मिळणार Union Budget संबंधित सर्व माहिती! आत्ताच डाऊनलोड करा

बनावट ॲप्स हे खऱ्या ॲप्सच्या डिझाइन आणि कार्यक्षमतेची एवढी हुबेहुब नक्कल करतात की या दोन्हींमधला फरक ओळखणं कठीण आहे. एखादा सामान्य नागरिक बनावट ॲप्स आणि खऱ्या ॲप्समधील फरक सहज ओळखू शकत नाही. ॲप स्टोअरमध्ये असे बनावट ॲप्स वारंवार दिसू लागले की त्याबद्दल खात्री वाटायला लागते. त्यामुळे युजर्स हे ॲप्स त्यांच्या फोनमध्ये डाऊनलोड करतात. पण बनावट ॲप्स ऑनलाइन व्यवहार क्षेत्रात ग्राहक आणि व्यापारी अशा दोघांनाही फसवतात. हे ॲप्स लॉगिन क्रेडेन्शिअल्स चोरतात तसेच ते युजर डेटाशी तडजोड करू शकतात, आणि पेमेंट प्रक्रियेतही फेरफार करू शकतात.

फसवणूक करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या डिव्हाइसवर पेमेंट कन्फर्मेशन दिसावे यासाठी बनावट ॲप्सचा वापर करतात. स्टोअरचा QR कोड स्कॅन केल्यानंतर यशस्वी व्यवहार झाला असल्याचे दर्शवतात. अशा फसव्या युक्तीमुळे सुरक्षिततेच्या उपायांमध्ये अडथळा येतो आणि दुकानदारांना पेमेंट पूर्ण झाल्याचा विश्वास दिला जातो. परंतु वास्तविक पैसे दिलेच जात नाहीत. या बनावट ॲप्सपासून सुरक्षित राहण्यासाठी सायबर सुरक्षा तज्ज्ञांकडून काही टीप्स शेअर करण्यात आल्या आहेत.

हेदेखील वाचा – इंटरनेट सेवा खंडित झाल्यास टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना बिलात सूट देऊ शकतात का? जाऊन घ्या सविस्तर

  • विकसकाचे नाव आणि टायपिंगमधील चुका किंवा इतर बाबी वेगळ्या वाटणे यावरून बनावट ॲप्स शोधा.
  • तुमच्याकडे योग्य पर्याय असल्याची खात्री करण्यासाठी अधिकृत वेबसाइटशी तुलना करा.
  • नेहमी अधिकृत स्त्रोतांकडून ॲप्स डाउनलोड करा.
  • स्थापित ॲप्समध्ये सहसा मोठ्या प्रमाणात रेटिंग आणि रिव्ह्यु असतात. एखाद्या ॲपचे खूप कमी रिव्ह्यु असल्यास किंवा एकसारखे वाटणारे सकारात्मक रिव्ह्यु जास्त असल्यास, हा बनावट ॲप असल्याची चेतावणी असू शकते.
  • बेसिक गेम/युटिलिटी ॲपसाठी संपर्क, कॅमेरा किंवा मायक्रोफोन यासारख्या अनावश्यक ॲक्सेससाठी परवानग्या मागणारी ॲप्स, वाईट हेतूने कार्यरत असण्याची शक्यता असू शकते.
  • तुम्ही व्यापारी/व्यवसायिक असल्यास, पेमेंट कन्फर्मेशनसाठी केवळ सत्यापित चॅनेलवर विश्वास ठेवा. फोनपे युजरच्या व्यवहार सूचनांसाठी पूर्णपणे तुमच्या फोनपे स्मार्टस्पीकरवर किंवा व्यवसायासाठी फोनपे ॲपवर अवलंबून रहा.
  • नवीन ॲप्स डाउनलोड करताना नेहमी सावध रहा आणि तुमच्या डिजिटल सुरक्षिततेला प्राधान्य द्या.
  • डाउनलोड केलेले ॲप फसवे असल्याचा तुम्हाला संशय असल्यास, तात्काळ कारवाई करा. यासाठी सर्वात आधी डाउनलोड केलेले ॲप अनइंस्टॉल करा, यामध्ये लॉगिन केलेल्या अकाऊंटसाठी पासवर्ड बदला, संशयास्पद ॲक्टिव्हिटींसाठी तुमच्या बँक आणि ऑनलाइन खात्यांचे निरीक्षण करा, तुमच्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरसह सुरक्षा स्कॅन करा आणि शेवटी, ॲपची तक्रार करा.
  • तुम्ही स्वतः अशा परिस्थितीत अडकलात, तर तुम्ही फोनपे ॲपवर किंवा कस्टमर केअर नंबरवर कॉल करून किंवा फोनपेच्या सोशल मीडिया हँडलवर अशा घोटाळ्यांची त्वरित तक्रार करू शकता.
  • तुम्ही जवळच्या सायबर क्राइम सेलमध्ये फसवणुकीच्या तक्रारी नोंदवू शकता किंवा https://www.cybercrime.gov.in/ वर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता किंवा सायबर क्राइम सेल हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधू शकता.

Web Title: Follow these steps of cyber security experts to stay safe from fake apps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 03:48 PM

Topics:  

  • cyber security experts

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.