मोफत मिळणार इव्हो गन स्किन, जाणून घ्या आजचे Free Fire Max Codes! आत्ताच करा Redeem
लोकप्रिय मोबाईल गेम फ्री फायरमध्ये अनेक नवीन ईव्हेंट सतत सुरु असतात. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक आकर्षक बक्षीसं जिंकण्याची संधी मिळते. ईव्हेंट व्यतिरिक्त प्लेअर्स फ्री फायरचे रिडीम कोड्स वापरून देखील अनेक बक्षीस जिंकू शकतात. नेहमीप्रमाणे आजसाठी देखील गरेनाने फ्री फायर प्लेअर्ससाठी रिडीम कोड जारी केले आहेत. ज्याच्या मदतीने प्लेअर्स अनेक आकर्षक बक्षीसं जिंकू शकतात.
इतकंच नाही तर प्लेअर्सना वेपन्स, डायमंड्स, इमोट्स, स्किन इत्यादी जिंकण्यासाठी देखील फ्री फायरचे रिडीम कोड्स मदत करतात. खरं तर फ्री फायरमध्ये प्लेअर्सना वेपन्स, डायमंड्स, इमोट्स, स्किन इत्यादी वस्तू जिंकण्यासाठी डायमंड खर्च करावे लागतात. पण गरेनाने जारी केलेल्या फ्री फायर कोडच्या मदतीने प्लेअर्स फ्रीमध्ये या सर्व वस्तू जिंकू शकतात. पण या कोड्सचा वापर करण्यासाठी मर्यादित कालावधी दिला जातो. शिवाय प्रत्येक प्रदेशासाठी काही निवडक रिडीम कोड दिले जातात. चला तर मग गरेनाने जारी केलेल्या आजच्या रिडीम कोड्सची यादी पाहूया. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्समध्ये The Midnight Reckoning इवेंट गेम लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना Skill Skin – Midnight Rush, Tatsuya, Midnight Havoc, Skull Hunter Weapon Loot Crate सारख्या वस्तू फ्रीमध्ये मिळवण्याची संधी मिळणार आहे. परंतु या सर्व वस्तू जिंकण्यासाठी गेमर्सना काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. Free Fire MAX The Midnight Reckoning इवेंट गेममध्ये 1 मेपासून सुरु झाला आहे. हा ईव्हेंट 11 मेपर्यंत सुरु राहणार आहे. या ईव्हेंटमध्ये आकर्षक बक्षीस जिंकण्यासाठी गेमर्सना काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. प्रत्येक रिवॉर्डसाठी गेमर्सना वेगळा टास्क असणार आहे.
BR Ranked मध्ये पाच गेम खेळल्यानंतर Skill Skin – Midnight Rush द्यावा लागणार आहे. यानंतर गेमर्स BR Ranked मध्ये 2 वेळा टॉप 3 मध्ये आल्यानंतर रिवॉर्ड मिळणार आहे. BR Ranked मध्ये 15 मॅच खेळाव्या लागणार आहेत किंवा 5 वेळा टॉप 3 मध्ये यावं लागणार आहे. त्यानंतर रिवॉर्ड मिळणार आहे.