करोडो iPhone युजर्सना हॅकिंगचा धोका, कंपनीने जारी केली Warning! 'या' फीचरचा वापर करणं पडू शकतं महागात
आयफोनचे असे काही फीचर्स आहेत, जे युजर्समध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. अशातीलच एक फीचर म्हणजे Apple चे AirPlay फीचर. हे फीचर युजर्सना म्यूजिक, फोटो आणि व्हिडीओ अॅपल डिवाइसेज आणि कंपॅटिबल थर्ड-पार्टी स्पीकर्स आणि टिव्हीवर सीमलेस पद्धतीने स्ट्रीमिंग करण्याची परवानगी देते. हे फीचर युजर्समध्ये लोकप्रिय असलं तरी देखील आता ते युजर्ससाठी धोकादायक ठरत आहे. कारण या फीचरमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स आयफोन युजर्सची माहिती लीक करू शकतात. ज्यामुळे सध्या Apple चे AirPlay फीचर वापरणं युजर्ससाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
मजबूती आणि स्टाईलचं उत्तम कॉम्बिनेशन आहे Realme चा हा स्मार्टफोन, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी
न्यूयॉर्क पोस्टनुसार, ‘AirBorne’ नावाचा मालवेअर सध्या आयफोन युजर्ससाठी धोका ठरत आहे. या मालवेअर युजर्सच्या वैयक्तिक माहितीवर नजर ठेवतो, याशिवाय हा मालवेअर तुमच्या डिव्हाईसला कनेक्ट असलेल्या वायफायसोबत जोडला गेला तर तो तुमचं बोलणं देखील ऐकू शकतो. यामध्ये एयरपोर्ट्स, कॉफी शॉप्स किंवा ऑफिस सारख्या पब्लिक प्लेसेसचा समावेश आहे. हॅकर्सपासून वाचण्यासाठी यूजर्सना सर्व डिव्हाईस लेटेस्ट सॉफ्टवेअरवर अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषत: जे युजर्स AirPlay फीचरचा वापर करत आहेत, त्यांनी सावध राहणं गरजेचं आहे आणि त्यांचं डिव्हाईस लेटेस्ट सॉफ्टवेअरवर अपडेट करण्याची गरज आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्ही AirPlay फीचरचा वापर करत नसाल तर तुम्ही ते पूर्णपणे डिसेबल करू शकता, असा सल्ला देण्यात आला आहे. कारण AirPlay फीचरमुळे हॅकर्स तुमचं डिव्हाईस कंट्रोल करू शकतात. ज्यामुळे तुमची सर्व माहिती हॅकर्सकडे जाऊ शकते आणि तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.
तेल अवीवच्या साइबरसिक्योरिटी फर्म Oligo चे चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर आणि को-फाउंडर गाल एल्बाज यांनी Wired ला सांगितलं आहे की, एअरप्ले इतक्या डिव्हाईसवर समर्थित आहे की अनेक डिव्हाईसना पॅच करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतील किंवा ते कधीही पॅच केले जाणार नाहीत. हे सर्व एका सॉफ्टवेअर दोषामुळे आहे जो प्रत्येक गोष्टीवर परिणाम करतो. ज्यामुळे आता जे युजर्स या फीचरचा वापर करत आहेत, त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे.’
Google मॅसेजमध्ये आलं कमाल फीचर, आता ब्लर होणार अश्लील ईमेज! जाणून घ्या कसं करेल काम
अॅपलच्या AirPlay प्रोटोकॉल आणि सॉफ्टवेयर डेवलपमेंट किट (SDK) मध्ये 23 त्रुटी आढळल्या आहेत, ज्या युजर्सना फोटो, म्यूजिक आणि व्हिडीओ डिवाइसेजमध्ये बीम करण्याची परवानगी देते. अॅपलने त्यांच्या या त्रुटी ठीक करण्यासाठी सिक्योरिटी अपडेट्स जारी केले आहेत. मात्र लाखो थर्ड-पार्टी गॅजेट्स, स्मार्ट टिव्हीपासून सेट-टॉप बॉक्स आणि कार सिस्टम्स अद्याप धोक्यात आहेत. कंपनीने सल्ला दिला आहे की, युजर्सनी वेळोवेळी त्यांच्या फोनचे सॉफ्टवेअर आणि इतर अॅप्स अपडेट करत राहावेत. कारण, त्यात आवश्यक सुरक्षा पॅचेस समाविष्ट आहेत.