‘भारतजेन’चा धमाका! स्वदेशी AI आता 15 भारतीय भाषांमध्ये बोलणार, यूजर्सचा अनुभव बदलणार; जाणून घ्या सविस्तर
सध्या १५ भाषांमध्ये काम पूर्ण झाले असून, याच १५ भाषांमध्ये ‘स्पीच’ (बोलणे) आणि ‘व्हिजन’ (पाहणे) मॉड्यूल्सही उपलब्ध होतील, या प्रकल्पांतर्गत भारतीय भाषांसाठी ऑटोमॅटिक स्पोच रिकग्निशन (एएसआर) आणि टेक्स्ट-टू-स्पीच (टीटीएस) अशा अत्याधुनिक सेवा दिल्या जाणार आहेत. ‘भारतजेन’ उपक्रमाची अंमलबजावणी २५ टेक्नोलॉजी इनोवेशन हब्स (टीआयएच) च्या माध्यमातून होत असून, त्यापैकी चार केंद्रे टेक्नोलॉजी ट्रान्सलेशनल रिसर्च पार्क्स (टीटीआरपी) मध्ये अद्ययावत करण्यात आली आहेत. (फोटो सौजन्य – X)
डेटा शेअरिंग काही अटी व नियमांनुसार केले जाईल, तसेच ही सेवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचाही विचार सुरू आहे. एआय विकासात जीपीयूचे (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट) महत्त्व अधोरेखित करताना, मोठ्या एआय मॉडेलसाठी हजारो जीपीयूंची आवश्यकता भासू शकते, असे मंत्री सिंह यांनी स्पष्ट केले. ‘इंडिया एआय’ मिशनअंतर्गत संगणकीय संसाधनांची उपलब्धता दिली जात आहे. वित्तपुरवठ्यासाठी खासगी क्षेत्रालाही संधी देण्यात आली असून, अधिक गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जात आहे.
देशासाठी स्वदेशी व सुरक्षित एआय मॉडेल विकसित करण्याचा ‘भारतजेन’चा उद्देश आहे. २५ टेक्नोलॉजी इनोवेशन हब्स (टीआयएच) च्या माध्यमातून ‘भारतजेन’ उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. या महिनाअखेरपर्यंत २२ भारतीय भाषांमध्ये मजकूर-आधारित (टेक्स्ट) सेवा पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सध्या भारतजेन अंतर्गत हिंदी, असमिया, बंगाली, गुजराती, कन्नड, मैथिली, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ आणि तेलुगू या १५ भारतीय भाषांमध्ये एआय सेवा कार्यान्वित करण्याची क्षमता उपलब्ध आहे.






