Recharge Plan: Airtel नंतर 'या' कंपनीच्या यूजर्सना बसणार फटका! बंद केला हा स्वस्त प्लॅन, मोजावे लागणार इतके पैसे
Vodafone Idea ने त्यांच्या पोर्टफोलिओमधील 28 दिवसांची व्हॅलिडीटी असलेला स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. या प्लॅनची किंमत 299 रुपये आहे. त्यामुळे आतापर्यंत जे यूजर्स हा प्लॅन खरेदी करत होते त्यांना 349 रुपयांचा प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. म्हणजेच आता यूजर्सना रिचार्ज करण्यासाठी 50 रुपये जास्त खर्च करावे लागणार आहेत. रिपोर्टनुसार, वोडाफोन-आइडियाने कर्नाटक, गुजरात, हरियाणा, दिल्ली आणि मुंबई टेलीकॉम सर्कलमध्ये हा प्लॅन बंद करण्याची घोषणा केली आहे. वोडाफोन आइडियाने या सर्व टेलीकॉम सर्कलमध्ये 5G सर्विस लाँच केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
वोडाफोन-आइडियाच्या 299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सध्या आंध्र प्रदेश आणि तेलंगाना, केरल, चेन्नई, कोलकाता, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गोवा, तामिलनाडु, पूर्वी आणि पश्चिमी उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग, फ्री नेशनल रोमिंग, डेली 1GB डेटा, 100 फ्री एसएमसएस सारखे फायदे देखील मिळतात.
वोडाफोन-आइडियाच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये देखील 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नेशनल रोमिंगची सुविधा मिळते. कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 1.5GB हाई स्पीड डेटा आणि 100 फ्री एसएमसएस सारखे फायदे मिळतात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटाची सुविधा देखील ऑफर केली जाते. याव्यतिरिक्त, यूजर्सना रात्रीच्या डेटाचा लाभ देखील दिला जाईल.
ट्रायच्या अलिकडच्या अहवालानुसार, व्होडाफोन आयडियाने एकाच महिन्यात अंदाजे 12 लाख वापरकर्ते गमावले. व्होडाफोन आयडियाच्या घटत्या वापरकर्त्यांच्या संख्येचा फायदा जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल या इतर तीन कंपन्यांना झाला आहे.






