Google Pixel 9 Pro Fold ची पहिली विक्री सुरु! 10 हजार रुपयांच्या बंपर डिस्काऊंसह खरेदी करण्याची संधी (फोटो सौजन्य - गुगल )
Google युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीची वाट पाहत होते, तो क्षण आता अखेर आला आहे. Google Pixel 9 Pro Fold ची पहिली विक्री सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी Google ने भारतीय बाजारात Google Pixel 9 Pro Fold लाँच केला होता. आता त्याची पहिली विक्री सुरु झाली आहे. उत्कृष्ट डिझाईन, दमदार फीचर्स, क्वालिटी कॅमेरा आणि पावरफुल बॅटरीसह Google Pixel 9 Pro Fold लाँच करण्यात आला होता. त्यानंतर आता या फोनची विक्री सुरु झाली आहे.
हेदेखील वाचा- WhatsApp अकाउंट डिलीट आणि डिएक्टिवेटमध्ये काय फरक आहे? अकाऊंटवरील डेटा कधी रिकव्हर होतो?
Google Pixel 9 Pro Fold फोन ऑब्सिडियन (ग्रे) आणि पोर्सिलेन (ऑफ-व्हाइट) या दोन रंगात लाँच करण्यात आला आहे. तुम्ही फोल्डेबल फोन घेण्याचा विचार करत असाल तर Google Pixel 9 Pro Fold तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. Google Pixel 9 Pro Fold च्या खरेदीवर तुम्हाला अनेक ऑफर्स देखील मिळणार आहेत. तुम्हाला ऐकूण धक्का बसेल की तुम्ही Google Pixel 9 Pro Fold स्मार्टफोन 10 हजार रुपयांच्या बंपर डिस्काऊंसह खरेदी करण्याची संधी मिळत आहे.
कंपनी जेमिनी सह Pixel 9 Pro Fold स्मार्टफोन ऑफर करते. या फोनबद्दल कंपनीचे म्हणणे आहे की, हा स्मार्टफोन Google च्या AI चा उत्तम अनुभव देतो. फोनच्या उत्कृष्ट प्रदर्शनासह, तुम्ही स्प्लिट स्क्रीनमध्ये मल्टीटास्क करू शकता. फोनच्या मागील कॅमेऱ्यातून उत्तम सेल्फी घेता येतात आणि हँड्स-फ्री फोटोंसाठी टेबलटॉप मोड वापरता येतो. एकूणच फोनमध्ये सर्वच फीचर्स देण्यात आले आहेत.
हेदेखील वाचा- Infinix Hot 50 5G स्मार्टफोन उद्या भारतात होणार लाँच! डिझाईन पाहून व्हाल थक्क
Google Pixel 9 Pro Fold फोन 160 mm Actua डिस्प्ले फुल स्क्रीनसह येतो. फोन 1080 x 2424 OLED, स्मूथ डिस्प्ले (60-120 Hz) सपोर्ट आणि 2700 nits पीक ब्राइटनेससह येतो. हा फोन 204 मिमी सुपर ॲक्टुआ फ्लेक्स डिस्प्ले (LTPO), 2076 x 2152 OLED, स्मूथ डिस्प्ले (1–120 Hz) सपोर्टसह येतो.
Google Pixel 9 Pro Fold फोन Google Tensor G4 चिपसेट आणि Titan M2 सुरक्षा कोप्रोसेसरसह येतो. Google फोल्डेबल फोन 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे.
Google Pixel 9 Pro Fold फोनमध्ये 4,650 mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोन फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येतो. एक्स्ट्रीम बॅटरी सेव्हरसह फोन पूर्ण 72 तास वापरला जाऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे.
गुगल फोल्डेबल फोन प्रगत ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टीमसह लाँच करण्यात आला आहे. फोन 48MP वाइड, 10.5MP अल्ट्रावाइड आणि 10.8MP टेलिफोटो लेन्ससह येतो. फोन 10 MP ड्युअल PD सेल्फी कॅमेरा सह येतो.
Google Pixel 9 Pro Fold ची किंमत 1,72,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्ही ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून Google Pixel 9 Pro Fold ची खरेदी करू शकता. आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्ही फोन ICICI बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला 10,000 रुपयांचे झटपट डिस्काऊंट मिळणार आहे.