Flipkart Republic Day 2026: विशलिस्ट तयार केली का? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोन्ससह या वस्तूंवर बंपर डिस्काऊंट
कंपनीने जारी केलेल्या टिझरनुसार, फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल 2026 हा 17 जानेवारी 2026 पासून सुरु होणार आहे. हा सेल किती दिवस सुरु असेल किंवा या सेलची शेवटची तारीख काय असणार आहे, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. फ्लिपकार्ट वेबसाईट आणि मोबाईल अॅपवर आगामी सेलचा डेडिकेटेड बॅनर लाईव्ह झाला आहे. या सेलमध्ये मोबाईल, लॅपटॉपसह इतर अनेक कॅटेगिरीमधील डिव्हाईसवर ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स उपलब्ध असणार आहे. सेलमध्ये या वस्तूंच्या किंमती अत्यंत कमी होणार आहेत. (फोटो सौजन्य – Flipkart)
कंपनीने असं सांगितलं आहे की, फ्लिपकार्ट प्लस आणि ब्लॅक मेंबर्सना इतर यूजर्सपेक्षा 24 तास आधीच या सेलचा अॅक्सेस मिळणार आहे. त्यामुळे प्लस आणि ब्लॅक मेंबर्स सेलमधील ऑफर्स आणि डिस्काऊंटचा फायदा घेऊ शकणार आहेत. सेलदरम्यान फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास यूजर्सना 5 टक्क्यापर्यंत कॅशबॅक दिला जाणार आहे. बजाज फिनसर्व्ह इन्स्टा ईएमआय कार्ड ग्राहकांना निवडक प्रोडक्ट्सवर 400 रुपयांची सूट मिळणार आहे.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने सेलमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व डिल्स आणि ऑफिशियल ऑफर्सचा अद्याप खुलासा केला नाही. मात्र आगामी सेलबाबत काही रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, अॅपलच्या आयफोन 16 आणि सॅमसंगच्या सॅमसंग गॅलेक्सी एस 25 वर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. त्यामुळे हे प्रिमियम आणि महागडे डिव्हाईस ग्राहकांना कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
सेलमध्ये केवळ प्रिमियम स्मार्टफोन्सचं नाही तर पोको आणि रिअलमी सारख्या ब्रँड्सच्या बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोन्सवर देखील ऑफर्स आणि डिस्काऊंट उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ग्राहक या ब्रँड्सचे स्मार्टफोन्स कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहेत. सर्वात मोठ्या ऑफर्स फोन (2a), फोन (3a) आणि CMF फोन (2) प्रो सारख्या नथिंग स्मार्टफोनवर देखील मिळू शकतात, जे फ्लिपकार्टवर एक्सक्लूसिव पद्धतीने विकले जातात.
Ans: हो, सेलदरम्यान iPhone वर मोठ्या सवलती आणि बँक ऑफर्स मिळतात.
Ans: ब्रँड आणि मॉडेलनुसार 20% ते 50% पर्यंत सूट मिळू शकते.
Ans: Plus मेंबर्सना अर्ली अॅक्सेस, एक्स्ट्रा ऑफर्स आणि फ्री डिलिव्हरी मिळते.






