Oppo Reno 15 Launched: कंपनीचा मास्टरस्ट्रोक! एकाचवेळी 4 फोन लाँच, परफॉर्मन्स आणि डिझाइनसह सर्वच टॉप क्लास
OPPO Reno 15c दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन आफ्टरग्लो पिंक आणि ट्विलाइट ब्लू रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या 8GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये आणि 12GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 37,999 रुपये आहे. (फोटो सौजन्य – X)
हा स्मार्टफोन तीन स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. तसेच हे डिव्हाईस ग्लेशियर व्हाइट, अरूरा ब्लू आणि ट्विलाइट ब्लू रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. या डिव्हाईसच्या 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 45,999 रुपये, 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 48,999 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 53,999 रुपये आहे.
हे डिव्हाईस देखील दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. तसेच हा स्मार्टफोन ग्लेशियल व्हाइट, अरूरा ब्लू आणि ट्विलाइट ब्लू अशा कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 59,999 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 64,999 रुपये आहे.
सनराइज गोल्ड आणि कोका ब्राउन ब्लू रंगात खरेदीसाठी उपलब्ध असलेला हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 67,999 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 72,999 रुपये आहे.
The #OPPOReno15Series pricing is now official:
• OPPO Reno15c 5G starting at ₹34,999
• OPPO Reno15 5G starting at ₹45,999
• OPPO Reno15 Pro Mini 5G starting at ₹59,999
• OPPO Reno15 Pro 5G starting at ₹67,999#TravelWithReno #AIPortraitCamera #LiveItYourWay pic.twitter.com/iOhxPXh6RU — OPPO India (@OPPOIndia) January 8, 2026
सिरीजमधील हे दोन्ही प्रो मॉडेल्स एक सारख्या फीचर्ससह लाँच करण्यात आले आहेत. प्रो मॉडेलमध्ये 6.78 इंच FHD+ डिस्प्ले आहे, तर प्रो मिनीमध्ये 6.32 इंच 1.5K रेजलूशनवाला डिस्प्ले दिला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेटवाल्या AMOLED डिस्प्ले सह उपलब्ध आहेत. यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7 देखील आहे. दोन्ही फोन MediaTek Dimensity 8450 प्रोसेसरवर आधारित आहेत आणि यामध्ये 12GB रॅमसह 512GB स्टोरेजचा सपोर्ट देण्यात आला आहे.
Oppo Reno 15 Pro आणि Reno 15 Pro Mini च्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 200MP चा मुख्य OIS कॅमेरा दिला आहे. याशिवाय फोनमध्ये 50MP चा अल्ट्रा वाइड आणि 50MP चा पेरीस्कोप टेलीफोटो कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या दोन्ही फोनमध्ये 50MP चा कॅमेरा दिला आहे. Oppo Reno 15 Pro मध्ये 6,500mAh बॅटरी आणि Reno 15 Pro Mini मध्ये 6,200mAh बॅटरी दिली आहे. यामध्ये चार्जिंगसाठी 80W सुपरवूक फास्ट चार्जर आहे. दोन्ही स्मार्टफोन Android 16 वर बेस्ड ColorOS 16 वर चालतात.
ओप्पोचे हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल्स देखील प्रो मॉडेल सारख्याच डिझाईनसह लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये 6.59 इंच LTPS AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. दोन्ही डिव्हाईसमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन आहे. Reno 15 मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 4 चिपसेट आहे. यासोबतच हे डिव्हाईस 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजसा सपोर्ट करते. Reno 15c मध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर आहे, तसेच यामध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज सपोर्ट देखील आहे.
रेनो 15 आणि रेनो 15c च्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP चा मुख्य, 50MP चा टेलीफोटो आणि 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हे स्मार्टफोन मॉडेल्स देखील Android 16 वर बेस्ड ColorOS 16 वर चालतात. Reno 15 मध्ये 6,500mAh बॅटरी आहे तर Reno 15c मध्ये 7000mAh बॅटरी दिली आहे. दोन्ही स्मार्टफोन 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.
Ans: हो, OPPO चे अनेक स्मार्टफोन्स भारतातच असेंबल केले जातात.
Ans: हो, OPPO फोन खासकरून कॅमेरा, AI फीचर्स आणि पोर्ट्रेट फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहेत.
Ans: OPPO फोनमध्ये Android आधारित ColorOS वापरला जातो.






