नव्या Honor स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप! 8,560mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज... रंग पर्याय पाहून व्हाल थक्क
हॉनरने त्यांचा नवीन स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे, ज्यामध्ये 256GB आणि 512GB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 28 हजार रुपये आणि 512GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत CNY 2,399 म्हणजेच सुमारे 33,600 रुपये आहे. हा स्मार्टफोन 4 रंगांच्या पर्यायांत लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये फँटम पर्पल, सनबर्स्ट गोल्ड, बांबू ग्रीन आणि फँटम नाईट ब्लॅक यांचा समावेश आहे. चीनमध्ये स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. अद्याप कंपनीने इतर देशांत हा स्मार्टफोन कधी लाँच केला जाणार, याची अधिकृत घोषणा केली नाही. (फोटो सौजन्य – X)
लेटेस्ट लाँच स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या फोनमध्ये 6.79-इंच अमोलेड स्क्रीन दिली आहे. यासोबतच या फोनमध्ये 6,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस मिळणार आहे. फोनमध्ये 3,840Hz पीडब्ल्यूएम डिमिंग, डीसीआय-पी3 वाइड कलर गॅमट कवरेज आणि1.07 बिलियन कलर्स सपोर्ट देखील मिळणार आहे.
फोनला पावर देण्यासाठी यामध्ये स्नॅपड्रगन 6 जेन 4 इन्हान्स्ड एडीशन चिपसेट आणि ॲड्रेनो 810 जीपीयू मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 8GB रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देखील मिळणार आहे. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये एआय डीफोकस आई प्रोटेक्शन, नॅचुरल लाइट जसे आई प्रोटेक्शन, एआय स्लीप एड डिस्प्ले, हार्डवेयर-लेवल लो ब्लू लाइट आणि अल्ट्रा डार्क मोड सारखे फीचर्स ऑफर केले जात आहेत.
फोटोग्राफीचा अनुभव चांगला व्हावा यासाठी हॉनरने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये f/1.8 अपर्चर आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलाइजेशन (EIS) वाला 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा मिळणार आहे. डिव्हाईस 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि 10x डिजिटल झूम सपोर्टला देखील सपोर्ट करते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनच्या समोरील बाजूला f/2.0 अपर्चर आणि 2D फेशियल रिकग्निशन सपोर्ट असलेला 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देखील मिळणार आहे.
हॉनर एक्स 70 प्रो मॅक्समध्ये 90W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,560mAh बॅटरी क्षमतेची ‘चिंगहाई लेक’ लिथियम-आयन पॉलिमर बॅटरी आहे.






