Google Map Update: नियर बाय रेस्टॉरंटपासून ते पेट्रोल पंपापर्यंत, गुगल मॅप कशाप्रकारे शेअर करते महत्त्वाची माहिती
गुगल मॅप तुम्हाला तुमच्या परिसरातील, शहरातील, देशातील, इतकंच नाही तर संपूर्ण जगातील ठिकाणांबद्दल माहिती देते. तुम्ही गुगलला अनेकदा तुमच्या निअरबाय ठिकाणांबद्दल माहिती विचारली असेल. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, गुगलकडे लोकल ठिकाणांची माहिती येते कशी, गुगल आपल्याला ही माहिती कशी शेअर करतो? याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गुगल मॅपसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
जवळपासची ठिकाणंं एक्सप्लोर करणे, रहदारी तपासणे, रिव्ह्यु तपासणे, एवढेच नाही तर युजर्सना दुकान उघडण्याच्या वेळा, रेस्टॉरंट मेनू इत्यादी सर्व माहिती गुगल मॅप्सवर मिळते. पण आता इथे प्रश्न असा आहे की गुगल मॅपला लोकेशन्स, रेस्टॉरंट आणि इतर आसपासच्या भागांची ही सर्व माहिती कशी मिळते. लोकल गाइड प्रोग्राममुळे हे शक्य झाले आहे. गुगलचा लोकल गाइड प्रोग्राम त्याला सर्व माहिती शेअर करत असतो. ही माहिती गुगल मॅप्स आपल्या युजर्सना शेअर करते. (फोटो सौजन्य – pinterest)
गुगलचा लोकल गाइड प्रोग्राम म्हणजे काय आणि ते कसे काम करते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही गुगलवर लोकल गाइड बनू शकता का, याबद्दल आता आपण जाणून घेऊया. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्यासाठी मजेदार असणार आहेत. कारण ज्या गुगल मॅप्सवरून आपण सर्व ठिकाणांची माहिती घेतो, त्याला ती माहिती कोणामार्फत दिली जाते, हे आता आपल्याला समजणार आहे.
गुगलचा लोकल गाइड प्रोग्राम हा गुगलसाठी लोकल डेटा क्राउडसोर्स करण्याचा एक मार्ग आहे ज्यामुळे युजर्सना विशिष्ट स्थानाबद्दल अधिक माहिती आणि डिटेल्स शोधण्यात मदत होते. हा एक ग्रुप आहे जो जगभरातील तुमच्यासारख्या लोकांचा वापर करून तयार केला आहे. जे लोकं गुगल मॅप्सचा वापर करतात, त्यांनी अलीकडे भेट दिलेल्या ठिकाणाबद्दल रिव्ह्यु शेअर करतात आणि माहिती देतात, अशा लोकांसाठी गुगलचा लोकल गाइड प्रोग्राम आहे.
यामध्ये तथ्य-तपासणी, काही संबंधित प्रश्न, फोटो, पुनरावलोकने यासारख्या तपशीलांचा समावेश आहे. गुगल मॅप त्याच्या युजर्सना एखाद्या विशिष्ट लोकेशनबद्दल काहीतरी चुकीचे आढळल्यास लोकेशनची माहिती जोडण्याची आणि एडीट करण्याची देखील अनुमती देते. यासाठी गुगल त्यांना काही पॉइंट्ससह बक्षीस देते.
त्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. एकदा तुम्ही लोकेशनला भेट दिल्यानंतर, गुगल मॅप्स यूजर्सना प्रथम स्टार रेटिंगच्या स्वरूपात फीडबॅक देण्यास सूचित करेल आणि नंतर डिटेल फॉर्म दिसेल जेथे यूजर्सना अतिरिक्त माहिती प्रदान करण्याचा पर्याय असेल जसे की फोटो, व्हिडिओ, वेळ इत्यादी गुगल त्यांना लोकेशनबद्दल काही प्रश्नही विचारते.
गुगल मॅपसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
असे केल्याने, युजर्सना काही गुण मिळतात आणि हे गुण त्यांना गुगल मॅप्समध्ये लेवल वाढवण्यास मदत करतील. एकदा विशिष्ट लेवल गाठली की, गुगल युजर्सना एक बॅज आणि डिस्काउंट व्हाउचर, गुगल वैशिष्ट्यांचा एक्सेस यासारखे विशेष पुरस्कार देते.