Jio Recharge Plan: केवळ 198 रुपयांत मिळणार दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग... जिओचा हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट
आता WhatsApp आणि Messenger स्वत: देणार स्कॅम अलर्ट! कसं काम करणार नवीन फीचर, जाणून घ्या सविस्तर
जिओच्या या रिचार्ज प्लॅनची किंंमत 198 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2GB डेटा ऑफर केला जातो. म्हणजेच या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 28GB डेटा मिळतो. कंपनीच्या या बजेट प्लॅनची व्हॅलिडीटी 14 दिवसांची आहे. म्हणजेच दोन आठवडे युजर्स कोणत्याही अडथळ्याशिवाय इंटरनेटचा वापर करू शकणार आहेत. जिओच्या या बजेट फ्रेंडली रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना कमी पैशांत बेसिक सुविधा ऑफर केल्या जाणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
या प्लॅनची सर्वात खास गोष्ट म्हणजे कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये केवळ डेटा नाही तर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील ऑफर केले जात आहेत. याशिवाय युजर्सना JioTV आणि JioAI Cloud सारखे एडिशनल बेनिफिट्स देखील मिळणार आहे. या सर्व फायद्यांचा विचार करता कंपनीचा हा प्लॅन वॅल्यू फॉर मनी असल्याचं सिद्ध झालं आहे. ज्यांचे बजेट कमी आहे आणि त्यांना डेटाची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय ठरू शकतो.
जर तुम्ही थोडी जास्त व्हॅलिडीटी असलेला प्लॅन शोधत असाल तर जिओचा 349 रुपयांचा प्लॅन देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो. जिओच्या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. याशिवाय या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2GB डेटा देखील ऑफर केला जातो. याशिवाय कंपनीच्या या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा देखील दिली जाते. यासोबतच या प्लॅनमध्ये युजर्सना JioHotstar, JioHome आणि इतर अॅप्सचा अॅक्सेस देखील दिला जात आहे. त्यामुळे हा प्लॅन देखील युजर्ससाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे.
जर तुमचा डेटा वारंवार संपत असेल आणि तुम्हाला सतत रिचार्ज देखील करायचा नसेल तर 349 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरणार आहे. याशिवाय जर तुम्हाला कमी काळासाठी रिचार्ज प्लॅनची गरज असेल आणि तुमचं बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी 198 रुपयांचा प्लॅन एक चांगला ऑप्शन ठरणार आहे.
Chhath Puja 2025: घरबसल्या तयार करा तुमचे आवडते फोटो, महागड्या DSLR चीही गरज नाही! फॉलो करा या टिप्स
थोडक्यात, जिओचा 198 रुपयांचा रिचार्ज प्लॅन अशा युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे, ज्यांना कमी बजेटमध्ये डेटा आणि एसएमएसची सुविधा पाहिजे आहे. तर 349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन अशा युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे, ज्यांना दिर्घकाळ व्हॅलिडीटी असलेला रिचार्ज प्लॅन बेस्ट ठरणार आहे.






