काय सांगता! केवळ 5,999 रुपयांच्या किंमतीत नवा Ai+ स्मार्टफोन लाँच, 50MP डुअल कॅमेरा आणि फीचर्स आहेत कमाल...
Ai+ Pulse 2 स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. ज्यामध्ये 4GB+64GB आणि 6GB+128GB यांचा समावेश आहे. डिव्हाईसच्या बेस व्हेरिअंट 4GB+64GB ची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर या स्मार्टफोनच्या 6GB+128GB व्हेरिअंटची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Ai+ Pulse 2 ची विक्री ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 11 मार्चपासून सुरु होणार आहे. याबाबत कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. लेटेस्ट स्मार्टफोनच्या खरेदीसाठी ग्राहक प्रचंड उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य – X)
Smoother, smarter and built for everyday wins. Pulse 2, Sale goes live March 11th, at 12 PM. Comment ‘➕’ if this is your kind of upgrade.#AiPlus #Pulse2 #FashionForwardTech #ConnectedLifestyle #AddaPlus pic.twitter.com/fkDoYGRQGM — Ai+ Smartphone (@aiplus_official) March 2, 2026
Ai+ Pulse 2 स्मार्टफोनमध्ये 6.745-इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनच्या तुलनेत लेटेस्ट लाँच डिव्हाईस स्मूद स्क्रॉलिंग एक्सपीरियंस ऑफर करतो. या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 450 निट्स आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T7250 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये LPDDR4x रॅम आणि eMMC स्टोरेज दिले आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50-मेगापिक्सेल डुअल एआई रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 6,000mAh ची Li-polymer बॅटरी दिली आहे. हा फोन 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. टेक कंपनी Ai+ ने असा दावा केला आहे की, हा फोन त्याच्या सेगमेंटमधील सर्वात स्लिम फोन आहे.
डिव्हाईसला IP64 रेटिंग मिळाले आहे. Pulse 2 स्मार्टफोन अँड्रॉइड 16 वर आधारित NxtQuantum OS वर चालतो. हा फोन हिरवा, निळा, गुलाबी, जांभळा आणि काळा रंग पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. Ai+ Pulse 2 ची विक्री ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 11 मार्चपासून सुरु होणार आहे.






