तुमच्या स्मार्टफोनमधील क्लाऊड स्टोरेजचे फायदे माहीत आहे का? वाचून व्हाल आश्चर्यचकित
अँड्रॉईड असो किंवा आयफोन प्रत्येक स्मार्टफोनमध्ये क्लाऊड स्टोरेजचे फीचर देण्यात आलेलं असतं. क्लाऊड स्टोरेज तुम्हाला तुमचा डेटा ऑनलाइन स्टोअर करण्याची सुविधा देते. याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही डिव्हाइसवरून तुमच्या फाइल्स ऍक्सेस करू शकता. क्लाउड स्टोरेजचे नाव तुम्ही बहुतेक वेळा ऐकले असेल. फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ इत्यादी डिजिटल डेटा क्लाउड स्टोरेजमध्ये सेव्ह केला जातो.
हेदेखील वाचा- व्हॉट्सॲपवर मिळणार स्नॅपचॅटचे फिल्टर्स आणि इफेक्ट्स, लवकरच येतंय नवीन फीचर
क्लाउड स्टोरेजचा फायदा असा आहे की आपल्याला कोणत्याही फिजिकल स्टोरेज आवश्यकता नाही आणि आपल्याला डेटाच्या सुरक्षिततेबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. क्लाउड स्टोरेज प्लॅटफॉर्म तुमचा डेटा ऑनलाइन सुरक्षित स्टोअर करण्याची सुविधा देतात. त्याच्या मदतीने, तुम्ही तुमच्या फायली कोठूनही, कोणत्याही डिव्हाइसवरून ॲक्सेस करू शकता. गूगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स, मायक्रोसॉफ्ट वन ड्राइव्ह, हे क्लाऊड स्टोरेजचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, जे तुम्हाला तुमचा डेटा ऑनलाईन सेव्ह करण्यासाठी मदत करतात. (फोटो सौजन्य – pinterest)
हेदेखील वाचा- स्मार्टफोन युजर्सची स्कॅमर्सपासून होणार सुटका, गूगलने एकाच वेळी लाँच केले पाच नवीन फीचर्स