Instagram, Youtube कि Facebook! पाकिस्तानात कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा होतो सर्वाधिक वापर? जाणून घ्या
पाकिस्तानात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पाकिस्तानात विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. प्रत्येकजण त्यांच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. पण इंस्टाग्राम, फेसबूक आणि युट्यूब यामधील कोणतं प्लॅटफॉर्म पाकिस्तानात सर्वाधिक लोकप्रिय आहे, तुम्हाला माहिती आहे का? प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या युजर्सची संख्या वेगवेगळी आहे. कोणत्या प्लॅटफॉर्मचे सर्वाधिक युजर्स आहेत, याबाबत आता आपण जाणून घेऊया.
जानेवारी 2024 मध्ये पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी (पीटीए) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि टिकटॉक सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर कोणत्या पातळीवर केला जातो हे स्पष्ट आहे, कोणत्या प्लॅटफॉर्मचे किती युजर्स आहेत, त्यामध्ये किती महिला आणि किती पुरुषांचा समावेश आहे जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीने जाहीर केलेल्या आकडेवारींचा विचार केला तर पाकिस्तानात व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबचा सर्वात जास्त वापर केला जातो. या व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मचे पाकिस्तानात 71.7 मिलियन यूजर्स आहेत. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या युजर्समध्ये पुरुषांची संख्या 72% आणि महिलांची संख्या 28% आहे. मोठ्या प्रमाणात कंटेंट लायब्रेरी मनोरंजन, शिक्षण, माहिती, जाहिरात आणि स्थानिक कंटेंट या सर्वांमुळे युट्यूबची लोकप्रियता वाढत आहे. विशेषतः स्थानिक कंटेंट क्रिएटर्सच्या वाढत्या संख्येमुळे YouTube अधिक आकर्षक बनले आहे.
यूट्यूब अव्वल स्थानी असला तरी देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूकची युजर्स संख्या देखील प्रचंड आहे. युट्यूबप्रमाणेच फेसबूक देखील लोकप्रिय आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानात फेसबूकचे 60.4 मिलियन युजर्स आहेत. यामध्ये 77% पुरुष आणि 23–24% महिलांचा समावेश आहे. युनिव्हर्सल अॅक्सेस, मार्केटप्लेस, ग्रुप्स, बिझनेस पेज आणि संभाषणे यामुळे फेसबूकचा वापर वाढत आहे. हा प्लॅटफॉर्म संभाषण, नेटवर्किंग आणि स्थानिक व्यवसायांसाठी एक मध्यवर्ती व्यासपीठ राहिले आहे.
युट्यूब आणि फेसबूकची लोकप्रियता प्रचंड असली तरी देखील इंस्टाग्रामची लोकप्रियता फार कमी आहे. पाकिस्तानात इंस्टाग्रामचे केवळ 17.3 मिलियन युजर्स आहे. फेसबूक आणि युट्यूबच्या तुलनेत ही संख्या फार कमी आहे. यामध्ये 64% पुरुष आणि 36% महिला आहेत. ज्यांना विज्युअल कंटेटची आवड आहे, त्यांना हा प्लॅटफॉर्म अधिक आकर्षित करतो. रील्स, स्टोरीज आणि इफेक्ट्समुळे हा प्लॅटफॉर्म युजर्सना आकर्षित करत आहे. उत्तम फॅशन, जीवनशैली आणि ब्रँडिंग सामग्रीसह, इंस्टाग्राम अनेक व्यवसाय आणि प्रभावकांसाठी पसंतीचा पर्याय बनला आहे.
पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी (पीटीए) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, हे स्पष्ट होतं की पाकिस्तानात युट्यूब आणि फेसबूकचे सर्वाधिक युजर्स आहेत.
YouTube – सर्वोच्च उपयुक्तता (71.7 मिलियन यूजर्स)
Facebook – दुसऱ्या स्थानावर (60.4 मिलियन यूजर्स)
Instagram – तरुणांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत आहे (17.3 मिलियन यूजर्स)
पासकिस्तानात युट्यूब युजर्सची संख्या किती आहे?
71.7 मिलियन यूजर्स
फेसबूक युजर्समध्ये पुरुषांची संख्या किती आहे?
77% पुरुष
पाकिस्तानातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युजर्सचा अहवाल कोणी सादर केला?
पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी (पीटीए)