iPhone Price Dropped: iPhone 14 खरेदी करण्याची सुवर्णसंधी, croma ची ही ऑफर तुम्हालाही करेल मालामाल! जाणून घ्या
ज्यांना आयफोन खरेदी करण्याची प्रचंड इच्छा आहे, पण बजेट कमी आहे अशा लोकांसाठी croma एक खास ऑफर घेऊन आला आहे. आयफोनची वाढती क्रेझ पाहता आता croma ने एक उत्तम ऑफर आणली आहे. croma तुम्हाला केवळ 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत iPhone 14 खरेदी करण्याची संधी देणार आहे. होय, हे खरं आहे. तुम्ही 50 हजारांहून कमी किंमतीत iPhone 14 खरेदी करू शकता. म्हणजेच आता तुम्ही आयफोन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. croma च्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.
croma त्यांच्या ग्राहकांना 50 हजारांहून कमी किंमतीत iPhone 14 खरेदी करण्याची संधी देत आहे. खरं तर आयफोन 14 2022 मध्ये लाँच करण्यात आला होता. मात्र तरीही अद्याप त्याची क्रेझ कमी झाली नाही. इतर फोन्सप्रमाणे युजर्समध्ये आजही iPhone 14 ची क्रेझ टीकून आहे. आजही आयफोन खरेदी करणं हे अनेकांचं स्वप्न आहे. त्यांचं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी croma आता सज्ज झाला आहे. तुम्ही देखील आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर croma च्या या ऑफर्स तुमच्यासाठी बेस्ट आहेत. croma मधून तुम्ही ही डील कशी मिळवू शकता आणि पैसे कसे वाचवू शकता याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
सप्टेंबरमध्ये आयफोन 16 सिरीज लाँच झाल्यानंतर, iPhone 14 ची किंमत 59990 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. आता ही किंमत पुन्हा कमी झाली आहे. क्रोमाच्या वेबसाइटवर, हा स्मार्टफोन सध्या 50,990 रुपयांना सूचीबद्ध आहे. याचा अर्थ खरेदीवर थेट 9000 रुपयांची सूट दिली जात आहे. ही ऑफर मिडनाईट, स्टारलाईट, पर्पल आणि ब्लू रंगांमध्ये 128 जीबी व्हेरिअंटसाठी आहे. या व्यतिरिक्त, तुम्ही बँक ऑफर्स देखील जोडू शकता ज्यामुळे तुमच्यासाठी किंमत आणखी कमी होईल.
तुम्हाला आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एचएसबीसी बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि एसबीआय यासह विविध बँक कार्डवर 1000 रुपयांची त्वरित सूट मिळू शकते. ज्यामुळे या स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होणार आहे. यामध्ये, तुम्ही एक्सचेंज ऑफर देखील जोडू शकता. यामुळे अंतिम किंमत आणखी कमी होईल. तथापि, एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या फोनची स्थिती, मॉडेल आणि ब्रँड यावर अवलंबून असेल.
iPhone 14 मध्ये ड्युअल-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, तो समोर 12MP सेन्सर आणि मागे 12MP सेंसर सेन्सरसह येतो. यात A15 बायोनिक चिपसेट आहे. यात 6.1 -इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे, जो 1200 निट्स पीक ब्राइटनेस आणि 1170 x 2532 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. त्याला सिरेमिक शील्ड ग्लासचे संरक्षण मिळाले आहे.