Samsung Galaxy S26 Ultra vs iPhone 17 Pro Max: कोण आहे खरा कॅमेरा किंग? खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा हे महत्त्वाचे फरक
सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्रामध्ये 50MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये चांगले स्टेबिलाईझेशन आणि जास्त डिटेल्स कॅप्चर करण्याची क्षमता असणार आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 12MP चा ऑटोफोकस सेल्फी कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. तर आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये 48MP अल्ट्रा वाईड सेंसर आणि 18MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे स्पष्ट होतं की, सॅमसंग जास्त रिझोल्यूशन आणि वाईट शॉट्सवर फोकस करते. तर अॅपल नॅच्युरल स्किन टोन्स आणि सातत्यपूर्ण सेल्फीसाठी योग्य निवड ठरते. (फोटो सौजन्य – Pinterest)
सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्रामध्ये सॅमसंगचा सिग्नेचर 200MP प्रायमरी सेंसर दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी f/1.4 अपर्चरसह लो लाईट फोटोग्राफी अधिक चांगली होऊ शकते. तर आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये 48MP चा मुख्य कॅमेरा सेंसर शिफ्ट OIS आणि मोठ्या पिक्सेल साईझसह देण्यात आला आहे. अॅपल केवळ मेगापिक्सेलपेक्षा रंग अचूकता आणि सुसंगततेवर लक्ष केंद्रित करते.
झूम फोटोग्राफीमध्ये सॅमसंग नेहमीच पुढे असतो आणि S26 अल्ट्रा देखील हा ट्रेंड सुरुच ठेवेल अशी अपेक्षा आहे. यामध्ये 3x टेलिफोटो आणि 5x पेरिस्कोप लेन्स दिले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जास्त फ्लेक्सिबिलीटी मिळू शकते. आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये सिंगल 4x पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आहे, जे ऑप्टिकल गुणवत्ता आणि स्थिरीकरणावर लक्ष केंद्रित करते. जर तुम्हाला जास्त झूम ऑफर करणाऱ्या स्मार्टफोन कॅमेऱ्याची गरज असेल तर तुम्ही सॅमसंगची निवड करू शकता.
व्हिडीओ रेकॉर्डिंगबद्दल बोलायचं झालं तर अॅपल आजही लोकांची पहिली निवड आहे. आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये प्रोरेस रॉ, अॅपल लॉग 2, डॉल्बी व्हिजन एचडीआर आणि स्थानिक व्हिडिओ सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्रा 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग, HDR10+ आणि सुधारित AI स्थिरीकरणासह लाँच केला जाऊ शकतो. सिनेमॅटिक व्हिडिओसाठी आयफोन चांगला पर्याय आहे, तर अधिक नियंत्रण आणि लवचिकतेसाठी सॅमसंग हा चांगला पर्याय आहे.






