कोकणातील पारंपरिक चवीची खासियत! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी बनवा चविष्ट बांगड्याचं तिखलं
कोकणच्या स्वयंपाकघरातील अतिशय खास आणि चविष्ट पदार्थ म्हणजे बांगड्याचं तिखलं. कोकणात मासे अतिशय आवडीने खाल्ले जातात. माशांपासून बनवले जाणारे प्रत्येक पदार्थ चवीला अतिशय झणझणीत आणि अप्रतिम लागतात. मालवणी मसाल्यांचा वापर करून बनवलेले बांगड्याचे तिखलंची चव सुंदर लागते. गरमागरम भाकरी किंवा भातासोबत तुम्ही आंबट तिखट चवीचे तिखलं पाहू शकता. जेवणात कायमच डाळभात किंवा तिखट आमटी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते.अशावेळी तुम्ही माशांपासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता. बाजारात सर्व प्रकारचे मासे सहज उपलब्ध होतात. त्यामुळे बांगड्यांऐवजी तुम्ही इतर माशांपासून सुद्धा तिखलं बनवू शकता. चला तर जाणून घेऊया बांगड्याचं तिखलं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – Instagram)
Recipe : टेस्टी गोष्ट अनहेल्दीच नसू शकते, आता क्रेव्हिंग झाली तर घरीच बनवून खा ‘रागी पिझ्झा’






