Jyoti Malhotra की Seema Haider, कोण करतं यूट्यूबवरून सर्वाधिक कमाई? वाचून तुम्हीही व्हाल हैराण
ज्योती मल्होत्रा आणि सिमा हैदर या दोन्ही सध्या चर्चेत असणाऱ्या युट्यूबर आहेत. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्यामुळे आणि पाकिस्तानातून भारतात आल्यामुळे अशा कारणांमुळे या युट्यूबर सध्या चर्चेत आहेत. सिमाबद्दल बोलायचं झाल तर ती काही वर्षांपूर्वी पाकिस्तानातून भारतात आली. ज्योतीबद्दल बोलायाचं झालं तर ती पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल चर्चेत आहे. या दोन्ही युट्यबर्सवर भारतातील जनतेने राग व्यक्त केला आहे. कारण या दोन्हींचा संबंध पाकिस्तानसोबत आहे. दोन्ही स्त्रिया युट्यूबर आहेत. या दोघी युट्यूबरून किती कमाई करतात, याबद्दल आता जाणून घेऊया.
‘ट्रॅवल विद जो’ या नावाने युट्यूब चॅनेल चालवणारी युट्यूबर ज्योती मल्होत्रा खूप प्रसिद्ध आहे. ती एक लोकप्रिय ट्रॅवल व्लॉगर आहे. ज्योती मल्होत्रा ही हरियाणाच्या हिसार भागातील रहिवासी आहे. ज्योतीच्या युट्यूब चॅनेलवर 3.82 लाख सब्सक्राइबर्स आहेत. ती देशा – विदेशात सतत फीरत असते. अलीकडेच तिने पाकिस्तानला भेट दिली होती आणि तिचा हा व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला होता. तिने शेअर केलेला हा व्हिडीओ आणि पाकिस्तानला दिलेली भेट सध्या चर्चेचा कारण ठरली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप ज्योतीवर करण्यात आला आहे. याच आरोपाखाली तिला हरियाणा पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे. आता ज्योतीला नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर ज्योती यूट्यूब आणि इंस्टाग्रामद्वारे कमाई करत होती. दरमहिना ज्योतीला तिच्या ट्रॅव्हल व्हिडीओसाठी युट्यूबकडून 83,000 ते 4.98 लाख रुपयांपर्यंतची कमाई व्हायची. तिने शेअर केलेल्या व्हिडीओना 50 हजारांहून अधिक व्ह्युज देखील आहेत. शिवाय ब्रँड प्रमोशनव्दारे ज्योती महिन्याला 1 ते 2 लाख रुपये कमवत होती.
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सिमाबद्दल बोलायचं झालं तर जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संताप व्यक्त केला जातोय. या हल्ल्यानंतर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. याच कारणामुळे नेपाळच्या मार्गे भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या तिच्याकडे भारतीय नागरिकत्त्व नाही. त्यामुळे तिला देखील पुन्हा पाकिस्तानात पाठवण्यात यावं अशी मागणी केली जात आहे.
ट्रॅवल व्लॉगर ज्योती मल्होत्रा करत होती या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर, पोलीस तपासात समोर आलं सत्य
सीमा पब्जी गेमद्वारे तिचा प्रियकर सचिन मीणाला भेटली. ती त्याच्या प्रेमात पडली आणि त्याला भेटण्यासाठी नेपाळमार्गे पाकिस्तानातून भारतात आली. सीमाने युट्यूबवर तिची एक आगळी – वेगळी ओळख निर्माण केली आहे. सीमा आणि सचिनचे एकूण 6 युट्यूब चॅनेल आहेत आणि या सर्व चॅनेल्सचे मिळून 17 लाखांहून सब्सक्राइबर्स आहेत. त्यांचे व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडतात. सीमा हैदर युट्यूबवर व्यूज, लाइव स्ट्रीमिंग, स्पॉन्सर्ड वीडियोज आणि ब्रँड प्रमोशनद्वारे महिन्याला 80 हजार रुपये ते 1 लाख रुपयांपर्यंत कमाई करते. त्यांची लोकप्रियता आणि व्हिडीओजना मिळणारा प्रतिसाद पाहता ही रक्कम लवकरच वाढण्याची शक्यता आहे.