अखेर Lava Agni 3 5G भारतात लाँच करण्यात आहे. याला मिडरेंजमध्ये अग्नी 2’चे सक्सेसर म्हणून आणले गेले आहे. ड्युअल स्क्रीनसह या नवीनतम फोनमध्ये अनेक खास फीचर्स आहेत. यात नवीन सेकेंडरी एमोलेड पॅनल आणि विविध कार्ये हाताळण्यासाठी ॲक्शन बटणासारखे बटण आहे. लावा अग्नी 3 डॉल्बी ॲटमॉस सपोर्टसह शक्तिशाली वैशिष्ट्य देते. कमी पैशात एक उत्तम मोबाईल घेण्याच्या विचारात असाल तर हा नवीनतम स्मार्टफोन तुमच्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन ठरेल. फोनची किंमत आणि फीचर्स याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Lava Agni 3 5G ची 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 22,999 रुपये आहे, तर 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. ग्राहकांना मिड आणि टॉप अशा दोन्ही व्हेरियंटवर रु. 2,000 ची सूट मिळू शकते, ज्यात रु. 8,000 च्या एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ घेता येईल.
हेदेखील वाचा – आता गुगल बनवणार लखपतीपासून करोडपती! घरात पडलेलं सोनं मिळवून देईल बक्कळ पैसा, काय आहे स्कीम? जाणून घ्या
Lava Agni 3 5G मध्ये 120 Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा FHD+ वक्र AMOLED डिस्प्ले आहे. यात कॅमेरा मॉड्यूलच्या उजव्या बाजूला 1.7-इंच एमोलेड सेकेंडरी पॅनेल देखील आहे.
हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 7300X सह 8GB LPDDR5 रॅम आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजसह येतो. यात चांगल्या थर्मलसाठी डेडिकेटेड वेपर कूलिंग चेंबर देखील आहे.
हेदेखील वाचा – फेसबुकवर आता करता येईल बक्कळ कमाई, मेटाने लाँच केला नवीन Monetization Program
हे ब्लोटवेअर फ्री Android 14 वर चालते. यात 3 वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि 4 वर्षांचे सिक्युरिटी पॅच आहेत. Lava Agni 3 5G मध्ये 66W फास्ट चार्जिंगसह 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
स्मार्टफोनमध्ये 50 MP Sony OIS प्रायमरी शूटर, 8MP अल्ट्रावाइड स्नॅपर आणि 8MP 3x झूम टेलीफोटो शूटर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.