iPhone 18 Pro Max बाबत समोर आले अपडेट्स, होऊ शकतात हे मोठे बदल! कॅमेऱ्याचा लूकही बदलणार...
9 सप्टेंबर रोजी जगभरातील मोठी टेक कंपनी असलेल्या Apple ने एका ईव्हेंटचे आयोजन केले होते. 2025 मधील कंपनीचा हा सर्वात मोठा ईव्हेंट होता. या ईव्हेंटमध्ये कंपनीने त्यांची आयफोन 17 सिरीज लाँच केली. या सिरीजमध्ये iPhone 17, iPhone Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max यांचा समावेश आहे. तसेच अनेक नवीन प्रोडक्ट्स देखील या ईव्हेंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. अद्याप कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोन सिरीजची विक्री सुरु झाली नाही. मात्र अशातच कंपनीच्या नेक्स्ट Gen आयफोनबाबत काही अपडेट्स समोर येत आहेत.
जर तुम्ही यावेळी iPhone 17 Pro मॉडेल वगळण्याचा विचार करत असाल, तर या लीक्स जाणून तुम्हाला खूप आनंद होईल. कारण आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max मध्ये काही मोठे अपग्रेड दिसू शकतात. म्हणजेच ज्याप्रणाणे आयफोन 16 सिरीजपेक्षा आयफोन 17 सिरीजमध्ये अनेक बदल करण्यात आले. त्याचप्रमाणेच आता आयफोन 17 सिरीजपेक्षा आयफोन 18 सिरीजमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. चला त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया… (फोटो सौजन्य – Pinterest)
MacRumors ने अलीकडेच शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, असं सांगितलं जात आहे की, iPhone 18 Pro Max मध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. पण यातील सर्वात मोठा बदल म्हणजे एक अंडर-डिस्प्ले फेस आईडी असू शकतो. मागील अहवालात असं सांगण्यात आलं होतं की, डिस्प्ले विश्लेषक रॉस यंग यांनी म्हटले होते की iPhone 17 Pro मॉडेलमध्ये हा बदल दिसून येऊ शकतो. परंतु हे वैशिष्ट्य 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.
याचा अर्थ असा आहे की, कंपनी iPhone 18 Pro सीरीज अंडर-स्क्रीन फेस आईडी या खास फीचरसह लाँच करू शकते. ज्यामुळे फोनचा लूक पूर्णपणे बदलणार आहे. तसेच एक छोटा डायनामिक आइलँड आगामी आयफोनला अधिक चांगला बनवू शकतो. या वर्षाच्या सुरुवातीला The Information ने एक अहवाल सादर केला होता. या अहवालात असा दावाही करण्यात आला होता की, टेक जायंट iPhone 18 Pro मॉडेल्समध्ये हे तंत्रज्ञान आणू शकते. त्यांचा हा दावा आता खरा होऊ शकतो.
अलिकडच्या अहवालांमध्ये असेही सूचित करण्यात आले आहे की iPhone 18 Pro मॉडेल्समध्ये व्हेरिएबल अपर्चरसह 48MP चा प्राथमिक कॅमेरा दिला जाऊ शकतो. ज्यामुळे युजर्स कॅमेरा लेंसमध्ये एंटर होणाऱ्या लाईट्स देखील अगदी चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकतात, ज्यामुळे वेगवेगळ्या लाइट कंडीशनमध्ये फोटो काढणे आणखी सोपे होईल. याशिवाय, iPhone 18 Pro लाइनअपमध्ये 2nm A20 Pro प्रो चिपसेट दिला जाऊ शकतो.