सध्या नेटफ्लिक्सच्या नावाने नवा घोटाळा सुरू आहे. जगातील 23 देशांतील युजर्सने या घोटाळ्याची तक्रार केली आहे. Netflix हे एक लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म आहे ज्याचा जगातील सर्वात मोठा यूजरबेस आहे. यावर नवनवीन प्रीमियम कंटेंट शेअर केला जातो, ज्याचा आनंद युजर्स घेऊ शकतात. अमेरिका, जर्मनी, स्पेन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि भारतात हे खूप लोकप्रिय आहे. अशात तुम्हीही रोजच्या जीवनात जर या प्लॅटफॉर्मचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. बिटफाइंडर (Bitfinder) या सायबर सिक्युरिटी फर्मने नुकत्याच दिलेल्या अहवालात नेटफ्लिक्सच्या नावाने होत असलेली फसवणूक उघड झाली आहे.
अशाप्रकारे करतात फ्रॉड
नेटफ्लिक्सचे जगभरात लाखो युजर्स आहेत, ज्याचा फायदा स्कमेर्स घेऊ इच्छित आहेत. अहवालानुसार, हॅकर्स युजर्सना Netflix अकाउंट सुस्पेंड होण्याबाबत बनावट अलर्ट मेसेज पाठवतात, ज्यामध्ये युजर्सना फेक Netflix पेजवर रीडायरेक्ट केले जाते. नेटफ्लिक्सच्या या बनावट लॉग-इन पेजवर, युजर्सचे क्रेडिट कार्ड तपशील चोरले जातात आणि नंतर त्यांची फसवणूक केली जाते. नेटफ्लिक्स अकाउंट सस्पेंड झाल्याचा इशारा युजर्सना मिळताच ते त्यावर क्लिक करतात आणि बनावट लॉग-इन पेजवर जातात. येथे हॅकर्स त्यांना त्यांचे अकाउंट ऍक्टिव्ह करण्यासाठी पेमेंट करण्यास सांगतात. बरेच युजर्स हॅकर्सच्या सापळ्यात अडकतात आणि त्यांचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड डिटेल्स एंटर करतात.
पब्लिक Wi-Fi वापरताना ‘या’ गोष्टी ध्यानात असूद्यात अन्यथा क्षणार्धात अकाउंट होईल रिकामा
बिटफाइंडरने नेटफ्लिक्सच्या या फिशिंग मेसेजबाबत लोकांना एक अलर्ट जारी केली आहे आणि त्यांना त्यावर टॅप किंवा क्लिक करू नका असे सांगितले आहे. अशा फेक अलर्टमुळे युजर्स आपली माहिती जाणूनबुजून किंवा नकळत हॅकर्सना पाठवतात. एकदा तुमची माहिती डार्क वेबवर पोहोचली की, तिचा गैरवापर होऊन तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. नेटफ्लिक्सवरील ही फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही काही टिप्सचे पालन करू शकता.
सरकारने दिले सडेतोड उत्तर, टेलिकॉम सेक्टरमध्ये खपवून घेतली जाणार नाही एका कंपनीची मनमानी
चुकूनही करू नका ही चूक