पब्लिक वाय-फाय, जसे की कॅफे, हॉटेल, विमानतळ किंवा रेल्वे स्थानकांवर उपलब्ध असलेले वाय-फाय हे अतिशय सोयीचे आहे. अनेकजण फ्रीमध्ये मिळत असलेल्या या वाय-फायचा मनमुरादपणे आनंद लुटतात. परंतु, हे देखील लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की पब्लिक वाय-फाय नेटवर्क (Public Wi-Fi network) हे नेहमीच सुरक्षित नसतात. स्कमेर्स अनेकदा याद्वारे लोकांचे मोबाईल फोन हॅक करतात. त्यामुळे हे नेटवर्क वापरताना काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. तुम्ही असे न केल्यास स्कॅमर तुमचे अकाउंट हॅक करून तुमचे बँक अकाउंट क्षणार्धात रिकामे करू शकतात.
स्कॅमर सार्वजनिक वाय-फाय वर लोकांना लक्ष्य का करतात?
पब्लिक वाय-फाय सहसा विनामूल्य असते. म्हणून, बहुतेक लोक इंटरनेट वापरण्यासाठी, चित्रपट डाउनलोड करण्यासाठी किंवा कार्यालयीन कामासाठी याचा वापर करतात. बरेच लोक असे करत आहेत, त्यामुळे पब्लिक वाय-फाय हे स्कॅमर्ससाठी हॅकिंगसाठी एक हॉटस्पॉट आहे. तसेच, येथील इंटरनेट वापरताना अनेकदा लोक संशयास्पद मेसेज आणि लिंक्सकडे लक्ष देण्यास विसरतात. असे याकडे दुर्लक्ष केल्यामुळेही ते सहज स्कमेर्सच्या जाळ्यात अडकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्हीही जर असे पब्लिक वाय-फाय वापरत असाल तर वेळीच सावधान व्हा आणि याचे नेटवर्क वापरण्याआधी काही गोष्टी जरूर ध्यानात ठेवा.
सरकारने दिले सडेतोड उत्तर, टेलिकॉम सेक्टरमध्ये खपवून घेतली जाणार नाही एका कंपनीची मनमानी
ऑनलाइन शॉपिंग करू नका
पब्लिक वाय-फायवर ऑनलाइन शॉपिंग करू नका. ऑनलाइन खरेदी करताना तुमच्या कार्डची माहिती चोरीला जाऊ शकते
VPN वापरा
व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) तुमच्या ऑनलाइन क्रियाकलापांना एन्क्रिप्ट करते आणि तुमची ओळख लपवते
सुरक्षित वेबसाइट वापरा
नेहमी HTTPS वेबसाइट वापरा कारण त्या सुरक्षित आहेत
आपले डिव्हाइस लॉक करा
तुम्ही सार्वजनिक वाय-फाय वापरत नसाल तर तुमचे डिव्हाइस लॉक करा
एकदम नवीन डिझाइन, कॅमेराही असेल तगडा, iPhone 17 मध्ये मिळतील अनेक खास फीचर्स
तुमचे डिव्हाइस अपडेट ठेवा
तुमचा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप नेहमी अपडेट ठेवा. अपडेट्समध्ये नेहमी हॅकिंग टाळण्यासाठी पॅच दिलेले असतात
संवेदनशील माहिती शेअर करू नका
पब्लिक वाय-फायवर तुमचे बँकिंग डिटेल्स, पासवर्ड किंवा इतर संवेदनशील माहिती कधीही शेअर करू नका
ऑटो-कनेक्ट फिचर बंद करा
तुमच्या डिव्हाइसवरील ऑटो-कनेक्ट फिचर बंद करा जेणेकरून ते तुमच्या परवानगीशिवाय कोणत्याही नेटवर्कशी कनेक्ट होणार नाही