नवीन वर्षाचा पहिला दिवस; २०२६ च्या Google Doodle मध्ये कॉफी, पुस्तक आणि बरचं काही... (फोटो सौजन्य: Google)
गुगलने या डूडलमधून संदेश दिला आहे की, नवीन वर्ष हे केवळ एक दिवसासाठी जल्लोष साजरा करण्याचे नसून स्वत:वर विचार करण्यासाठी, नवी ध्येये ठरवण्यासाठी, मनाच्या शांतीसाठी आणि सर्व संकल्प शांततेने पूर्ण करण्यचा संदेश दिला आहे.
काय आहे या डुडलमध्ये ?
या डुडमध्ये एक शांततामय दृश्य आहे. यामध्ये एका बुकवर 2026 लिहिण्यात आले असून त्यावर एक पेन आणि कॉफीचा कप ठेवलेला आहे. हे चित्र नवीन वर्षाचे सुरुवातील थांबून, वेळ घेऊन शांततेने विचार करण्याचे, योजना बनवण्याचे दर्शवते. याशिवाय Google च्या अक्षरांमध्ये देखील बदल झाला आहे. यामध्ये O अक्षर हे डंबलमध्ये दिसत आहे. J मधून फिटनेसचा संदेश देण्यात आला आहे, तर पुन्हा यार्न दाखवून रचनात्मतेचे प्रतीक दर्शवण्यात आले आहे. शेफची टोपी आणि सॅलेडही दाखवण्यात आले आहे. जे हेल्दी लाईफस्टाईलकडे लक्ष वेधते. हे सर्व एकमागून एक येताना दिसत आहे. यामध्ये कॉफीच्या कपवर हार्टचे चिन्ह दाखवण्यात आले आहे. तसेच यातून युनिव्हर्सल पॉझ बटन दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जर याचा नीट विचार केला तर गुगलच्या या डुडलचा खूप खास अर्थ समोर येतो. यातून गुगल लोकांना संदेश देत आहे की, नवीन वर्षात संकल्प करा, त्यावर विचार करावा, एका नव्या कॅनव्हाससारखे स्वत:ला स्वीकारा. कोणतेही ध्येय ठरवताना त्याचा विचार करा, शांततेचा अनुभव घ्या. सर्वांना नवीन वर्षाच्या उजळ आणि आनंदी शुभेच्छा देतो असे यातून गुगलने संदेश दिला आहे. या गुगल डूडलवर क्लिक केल्यास तुम्हाला पेजवर जागतिक नववर्षाचे महत्त्व आणि विवध देशांमध्ये साजरे केले जाणारे प्रकार, परंपरा आणि उत्सवाची माहिती मिळेल.






