फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल आता लाइव्ह झाली आहे. या वार्षिक सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनसह सर्व इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत चांगला 5G स्मार्टफोन शोधत असलेल्यांना या विक्रीतील खरेदीमुळे लक्षणीय बचत होऊ शकते. सॅमसंग, पोको, रेडमीसह असे अनेक फोन आहेत जे फ्लिपकार्टवरून 10 हजार रुपयांपेक्षा कमी ऑफरमध्ये खरेदी केले जाऊ शकतात. तुम्हीही नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर ही सुवर्णसंधी अजिबात मिस करू नका आणि आजच या संधीचा लाभ घ्या. खरेदी करण्यासाठी तुम्ही फ्लिपकार्टच्या अधिकृत वेब साइटला भेट देऊ शकता. जाणून घेऊयात यात कोणकोणत्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.
सॅमसंगच्या या फोनमध्ये 4GB रॅमसह 64GB आणि 128GB स्टोरेज पर्याय आहेत. त्याचा 128 जीबी व्हेरिएंट फ्लिपकार्टवरून 9,999 रुपयांना खरेदी करता येईल. त्याचा 64 GB व्हेरिएंट फक्त 8,999 रुपयांना उपलब्ध आहे. स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यास, तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. यावर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.
हेदेखील वाचा – UPI करण्यापूर्वी हा ऑप्शन बंद करा नाहीतर ऑटोमॅटिक बँक खात्यातून पैसे कट होतील
Poco M6 5G चा 6GB + 128GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 9,499 रुपयांना विक्रीसाठी लिस्ट केला आहे. फोनमध्ये 1 TB पर्यंत स्टोरेज एक्सपांड करण्याची सुविधा आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 5MP सेल्फी कॅमेरा आहे. पॉवरसाठी, फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आणि MediaTek डायमेंशन 6100plus चिपसेट दिला आहे.
तीन रंगांच्या ऑप्शन्समध्ये उपलब्ध, Motorola g45 5G तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. याचा 4GB + 128 व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 9,999 रुपयांना विक्रीसाठी लिस्ट करण्यात आला आहे. यात 5000 mAh बॅटरी आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे. मागील पॅनलवर 50MP+2MP ड्युअल कॅमेरा सेटअप आहे.
हेदेखील वाचा – वैज्ञानिकांची कमाल! आता स्वप्ने रेकॉर्ड करेल ही मशीन, झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचा पाहू शकता व्हिडिओ
Redmi 12 चा 6GB + 128GB व्हेरिएंट फक्त 8,999 रुपयांना फ्लिपकार्टवरून खरेदी केला जाऊ शकतो. यात 50MP+8MP+2MP बॅक कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8MP सेन्सर आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि Helio G88 प्रोसेसर देण्यात आला आहे.
Infinix कडूनही 10 हजारांपेक्षा कमी किमतीत बजेटमध्ये Infinix Hot 50 5G सादर केला गेला आहे . तुम्ही हा स्मार्टफोन 9,999 रुपयांना खरेदी करू शकता. या फोनमध्ये Dimensity 6300 प्रोसेसर आणि 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.