OnePlus 15 स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच कंपनीने शेअर केले डिझाईन, Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटने सुसज्ज असणार डिव्हाईस
OnePlus 15 स्मार्टफोनची प्रतिक्षा आहे. हा स्मार्टफोन कधी लाँच होणार याबाबत सर्वजण उत्सुक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी OnePlus 15 स्मार्टफोन ऑक्टोबर महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन लाँच होण्याआधाची कंपनीने स्मार्टफोनच्या डिझाईनचा खुलासा केला आहे. कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत स्मार्टफोनची डिझाईन शेअर केली आहे. वनप्लसचा हा आगामी स्मार्टफोन OnePlus 13 ला रिप्लेस करणार आहे. वनप्लसने त्यांचा आगामी स्मार्टफोन लाँचपूर्वीच Snapdragon Summit Global हाइलाइट मीट दरम्यान सादर केला आहे.’
OnePlus India चे सीईओ CEO रॉबिन ली ने स्टेजवर अपकमिंग स्मार्टफोनची पहिली झलक सादर केली. तसेच त्यांनी कंपनीच्या आगामी स्मार्टफोनच्या डिझाईनबाबत देखील काही अपडेट शेअर केले आहेत. आगामी OnePlus फोनची रचना OnePlus 13s सारखीच असेल. मात्र त्याच्या फीचर्समध्ये काही बदल केले जाणार आहेत. स्मार्टफोनची किंमत किती असणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे स्मार्टफोनच्या किंमतीचा अंदाज लावला तर हा स्मार्टफोन मिडरेंज किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – X)
OnePlus 15 in Sand Dune pic.twitter.com/POdCzpzZmf — OnePlus Club (@OnePlusClub) September 26, 2025
अपकमिंग OnePlus 15 स्मार्टफोन कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन असणार आहे, ज्यामध्ये क्वालकॉमचा Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट दिला जाणार आहे. कंपनीने पहिल्यांदाच त्यांच्या आगामी स्मार्टफोनची डिझाईन सार्वजनिकरित्या टीझ केली आहे. वनप्लसच्या अपकमिंग स्मार्टफोनच्या बॅक पॅनलचे डिझाईन शेअर करण्यात आले आहे. याच्या डिझाईनच्या एलिमेंटबद्दल बोलायचं झालं तर हे डिझाईन OnePlus 13s प्रमाणेच आहे. त्याच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात एक रेक्टेंगुलर कॅमेरा मॉड्यूल दिसेल.
OnePlus ने कन्फर्म केलं आहे की, त्यांच्या अपकमिंग फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर दिला जणार आहे. हा Qualcomm च्या फ्लॅगशिप मोबाइल चिपसेट आहे, जो TSMC च्या 3nm (N3P) प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. हे चिपसेट 64-बिट आर्टेक्चरवर आधारित आहे, जे मागील जेनरेशनच्या चिपसेट परफॉर्मेंसच्या तुलनेत 23 टक्के अधिक चांगला आहे. यासोबतच कार्यक्षमतेत 20 टक्के सुधारणा देखील आहे. OnePlus 15 स्मार्टफोनसोबत, हा Qualcomm प्रोसेसर Xiaomi 17 सीरीज, Honor Magic 8 सीरीज आणि Realme GT 8 Pro स्मार्टफोनना शक्ती देईल अशी अपेक्षा आहे.
OnePlus 15 च्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर कंपनीने हे कन्फर्म केलं आहे की, या आगामी स्मार्टफोनमध्ये 165Hz डिस्प्ले दिला जाणार आहे. यापूर्वी कंपनीने 120Hz पॅनल दिला होता. नवीन डिस्प्लेमुळे, वापरकर्त्यांना उच्च फ्रेम रेटसह चांगला गेमिंग अनुभव मिळेल. हा OnePlus फोन Android 16 वर आधारित ColorOS 16 वर चालेल.