तंत्रज्ञानाचे वर्चस्व की मानवाशिवाय भविष्य? आता माणसांची गरजच नाही, 2030 पर्यंत जगावर राज्य करणार या 5 टेक्नोलॉजी
टेक्नोलॉजीमध्ये सतत काही ना काही बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या बदलत्या तंत्रज्ञानामुळे आता मानवांच्या पारंपारिक भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजेंस, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन सारख्या तंत्रज्ञानामुळे आपलं जीवनं पूर्णपणे बदललं आहे. या तंत्रज्ञानाने आपलं जीवन अत्यंत सोपं केलं आहे. मात्र आता यामुळे मानवांच्या नोकऱ्यांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत जेव्हा AI ला विचारण्यात आलं होतं, तेव्हा त्याने सांगितलं की, 2030 पर्यंत 5 असे तंत्रज्ञान आहेत जे ज्याचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि यामुळे मानवांची गरज कमी होणार आहे.
AI चा वापर आपल्या रोजच्या जीवनात केला जात आहे. मात्र 2030 पर्यंत AI मानवापेक्षा जास्त प्रगतशील होऊ शकतो आणि हा अधिक जलद आणि अचूकतेने निर्णय घेऊ शकणार आहे. हेल्थकेयर, बँकिंग, एजुकेशन, न्यायव्यवस्था यासारख्या क्षेत्रात AI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. डॉक्टरऐवजी AI कडून डायग्नोसिस, वकीलऐवजी AI कडून केस स्टडी आणि टीचर्सऐवजी AI ट्यूटर पाहायला मिळू शकतात. AI चा सर्वात मोठा परिणाम लोकांच्या नोकऱ्यांवर होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
2030 पर्यंत रोबोट्स केवळ फॅक्ट्रिपर्यंत मर्यादित राहणार नाहीत. 2030 पर्यंत घरांमध्ये जेवण बनवण्यासाठी, वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी रोबोटचा वापर केला जाऊ शकतो. ऑटोमेशनमुळे, उद्योग आणि कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात यंत्रे मानवी कामगारांची जागा घेतील. ट्रांसपोर्ट आणि लॉजिस्टिक्स सेक्टर देखील पूर्णपणे ऑटोमेटेड होऊ शकतो. अशा परिस्थितीत आता असा प्रश्न निर्माण होत आहे की, जेव्हा सर्व कामं यंत्रे करतील, तेव्हा मानवांची भूमिका काय असेल?
क्वांटम कंप्यूटर येणऱ्या काळात मोठी क्रांती करू शकतो. हे कंप्यूटर सामान्य कंप्यूटरपेक्षा लाख पटीने चांगला आहे. यामुळे नवीन औषधांचा विकास, स्पेस एक्सप्लोरेशन आणि हवामानाच अचूक अंदाज या सर्व गोष्टी शक्य होणार आहेत. मात्र यामुळे संकट देखील वाढू शकते. कारण क्वांटम टेक्नोलॉजी साइबर सुरक्षा तोडू शकते. ज्यामुळे अनेकांच्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
2030 पर्यंत मानवी जनुकांमध्ये बदल करून, आपल्याला रोग उद्भवण्यापूर्वीच ते नष्ट करण्याची क्षमता मिळेल. CRISPR सारख्या तंत्रज्ञानामुळे केवळ मानवांनाच नाही तर प्राणी आणि झाडांमध्ये देखील बदल केला जाणार आहे. हे रोमांचक वाटत असले, तरी देखील त्यामुळे “डिझायनर बेबीज” आणि नैतिक वाद देखील निर्माण होऊ शकतात.
Android 16 वर आधारित HyperOS 3 अखेर लाँच! Xiaomi, Poco आणि Redmi च्या या डिव्हाईसना मिळणार अपडेट
मेटावर्स आणि वर्चुअल रियलिटी आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. 2030 पर्यंत, लोक आभासी जगांमध्ये काम करतील, शिक्षण घेतील आणि अगदी खरेदीही करतील. वास्तविक जग आणि डिजिटल जग यांच्यातील सीमा पुसट होतील.