Happy Birthday Google: 27 वर्षांचा झाला सर्वांचा लाडका गुगल, जाणून घ्या या टेक जायंटच्या सुरुवातीचे रहस्य आणि अनोख्या गोष्टी
इंटरनेटच्या जगातील सर्वात मोठं नाव असलेल्या गुगलचा आज वाढदिवस आहे. टेक जायंट कंपनी आणि जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन गुगल आज त्याचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज जगातील प्रत्येक व्यक्ती गुगलचा वापर करत आहे. प्रत्येक छोट्या – मोठ्या कामांसाठी गुगलचा वापर केला जात आहे. गुगलमध्ये अनेक टूल्सचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ऑनलाइन एडवरटाइजिंग, मेल सर्विस, स्ट्रीमिंग सर्विस आणि क्वाउड स्टोरेजसह एडवांस AI टूल्सचा देखील समावेश आहे. पण या जगातील सर्वात मोठ्या इंजिनची सुरुवात कशी झाली आणि गुगलने जगावर आपलं वर्चस्व कसं निर्माण केलं जाणून घेऊया.
गुगलची स्थापना लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी केली होती. दोघांनी स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीमधून पीएचडी केली आणि याचदरम्यान गुगलच्या स्थापनेला सुरुवात झाली. सर्वात आधी त्यांनी आपल्या सर्च इंजिनची सुरुवात केली. या कंपनीला अल्फाबेट या नावाने देखील ओळखले जाते. सर्वात आधी गुगलचे नाव बॅकरब होतं, नंतर हे नाव बदलून गुगल असं ठेवण्यात आलं. लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी 4 सप्टेंबर 1998 मध्ये गुगल म्हणून खाजगी कंपनी म्हणून नोंदणीकृत केली. त्यांनी गुगलचे डोमेन 15 सप्टेंबर 1997 रोजी रजिस्टर केले होते. 27 सप्टेंबर रोजी कंपनीने विक्रमी संख्येने वेब पेजेस इंडेक्स केले होते. त्यामुळे हे यश लक्षात ठेवण्यासाठी गुगलचा वाढदिवस 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. कमी काळातच गुगलने एक आघाडीचे सर्च इंजिन म्हणून आपले वर्चस्व निर्माण केले. (फोटो सौजन्य – Pinterest)
गुगलचे पहिले ऑफीस कॅलिफोर्नियामध्ये एका गॅरेजमध्ये होतं. आता गुगलचे ऑफीस माउंटेन व्यू कॅलिफोर्नियामध्ये स्थित आहे. गूगलचे सर्वात मोठे प्रोडक्ट मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम Android आणि वीडियो स्ट्रीमिंग YouTube आहे, याची गुगलने खरेदी केली आहे. कंपनीने 2005 मध्ये अँड्रॉईड आणि 2006 मध्ये युट्यूब खरेदी केले होते. गुगलने त्याच्या नावाशी संबंधित अनेक डोमेन नोंदणीकृत केले आहेत
गुगलच्या ऑफीसमध्ये काम करणारे कर्मचारी स्वत:ला Googlers असं म्हणतात. तर कंपनीतील नवीन कर्मचाऱ्यांना Nooglers म्हटलं जातं. गुगल कर्मचारी त्यांचे पाळीव प्राणी देखील ऑफीसमध्ये घेऊन जाऊ शकतात. गुगलवर Do a barrel Roo टाईप केल्यास पेज 360 डिग्री फिरते. जर तुम्ही “Askew” शोधलात तर शोध पृष्ठ थोडेसे झुकते. शिवाय, जर तुम्ही “Google Gravity” टाइप केले आणि नंतर “I’m Feeling Lucky” दाबले तर Google पृष्ठ पूर्णपणे कोलॅप्स होते.
वाढदिवसानिमित्त गुगलने एक खास डूडल होम पेजवर सादर केले आहे. यावेळी 27 व्या वाढदिवसानिमित्त मजेदार आणि नॉस्टैल्जिक अंदाजात डूडल सादर करण्यात आले आहे. त्यात 90 च्या दशकातील आठवणींना उजाळा देण्यासाठी गुगलचा पहिला लोगो (1998 पासून) आहे.