फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात
भारतामधील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड पोको (POCO) ने आपला लेटस्ट स्मार्टफोन POCO M7 Plus 5G सादर करत त्याच्या विक्रीला आजपासून अधिकृतपणे सुरूवात केली आहे. फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेला हा पॉवर-पॅक स्मार्टफोन नक्कीच ग्राहकांना आवडेल.
या डिव्हाईसमध्ये मिळणारी ७००० एमएएच सिलिकॉन-कार्बन बॅटरी, विशाल ६.९ इंच एफएचडी+ डिस्प्ले आणि १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट यामुळे ग्राहकांना अविरत मनोरंजनाचा अनुभव मिळणार आहे. याशिवाय, स्नॅपड्रॅगन ६एस जेन ३ प्रोसेसर आणि जवळपास १६ जीबी टर्बो रॅम यामुळे हा स्मार्टफोन गेमिंग, मल्टिटास्किंग आणि दीर्घकालीन वापरासाठी सर्वोत्तम ठरतो.
POCO M7 Plus 5G ची सुरुवातीची किंमत अतिशय आकर्षक ठेवण्यात आली आहे
६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंट : ₹१२,९९९
८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंट : ₹१३,९९९
लाँच ऑफर्स अंतर्गत, ग्राहक HDFC, SBI किंवा ICICI बँक कार्ड्स वापरून 1 हजार रुपयांची त्वरित बँक सूट मिळवू शकतात. तसेच, पात्र डिव्हाइसवर हजार रुपयांचा अतिरिक्त एक्स्चेंज बोनस दिला जात आहे. या मर्यादित कालावधीच्या ऑफर्समुळे POCO M7 Plus 5G आपल्या किंमत श्रेणीत सर्वात आकर्षक पर्याय ठरतो.
लॉंग बॅटरी बॅकअप : ७००० एमएएच सिलिकॉन-कार्बन बॅटरी ही या कॅटेगरीत सर्वात मोठी आहे. जवळपास १६०० चार्ज सायकल्स देणारी ही बॅटरी ४ वर्षांपर्यंत टिकाऊ असून १८ वॅट रिव्हर्स चार्जिंगची सुविधा देते.
Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
सर्वोत्तम व्ह्यूईंग अनुभव : ६.९ इंचाचा मोठा एफएचडी+ डिस्प्ले १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटसह सुसज्ज असून, चित्रपट पाहणे, गेमिंग किंवा सोशल मीडियावर स्क्रोलिंग करणे अधिक आकर्षक बनवतो.
मजबूत परफॉर्मन्स : स्नॅपड्रॅगन ६एस जेन ३ प्रोसेसर आणि टर्बो रॅम तंत्रज्ञानामुळे जवळपास १६ जीबी पर्यंतची रॅम वापरता येते, ज्यामुळे मल्टिटास्किंग विनाव्यत्यय चालते.
सुरक्षिततेची जास्त खात्री : या स्मार्टफोनमध्ये २ ओएस जनरेशन्स अपडेट्स आणि ४ वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्यात आले आहेत. तसेच, IP64 धूळरोधक आणि जलरोधक प्रमाणपत्रासह हा फोन अधिक सुरक्षित ठरतो. कंपनीने ग्राहकांना ४८ महिने विनाव्यत्यय परफॉर्मन्सची हमी दिली आहे.
फ्लिपकार्टवर १९ ऑगस्ट दुपारी १२ वाजल्यापासून हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. पोकोच्या या लाँच ऑफर्समुळे ही सणासुदीच्या खरेदीसाठी एक परिपूर्ण संधी ठरणार आहे.