Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस अनेक बदल होत आहेत. अनेक नवीन शोध लावले जात आहेत. केवळ स्मार्टफोनचं नाही तर वॉशिंग मशीन आणि फ्रीजमध्ये देखील सध्या अनेक बदल केले जात आहेत. इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स दिवसेंदिवस अपडेट्स होत आहेत. त्यामुळे हे गॅझेट्स वापरण्याची मजा देखील दुप्पट होते. या गॅझेट्ममध्ये अनोखे फीचर्स दिले जातात, त्यामुळे त्यांची कार्यक्षमता देखील सुधारली आहे. फ्रीजमध्ये देखील असे अनेक अपग्रेडेड फीचर्स दिले जात आहेत.
फ्रीज एक असं इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आहे, ज्याचा वापर आपण रोज करतो. अन्न स्टोअर करण्यासाठी, थंड पाण्यासाठी आपण फ्रीजचा वापर करतो. घराचा लूक अधिक चांगला करण्यासाठी आपल्या फ्रीजचे देखील मोलाचे योगदान असते. पण आपला फ्रीज आपल्यसाठी किती फायदेशीर आहे, हे फ्रीजमधील फीचर्स ठरवतात. आता आम्ही तुम्हाला अशाच काही फीचर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजेल की तुमचा फीचर खरंच उपयोगी आहे की नाही… (फोटो सौजन्य – Pinterest)
सध्याच्या फ्रीजमध्ये इन्वर्टर कंप्रेसर दिला जातो, ज्यामुळे तुमच्या गरजेनुसार कुलिंग एडजस्ट केले जाते. म्हणजेच जर फ्रीजमध्ये कमी सामान असेल तर फ्रीज कमी कूलिंग देईल. ज्यामुळे विजेची देखील बचत होणार आहे आणि फ्रिज लवकर खराब होणार नाही.
सध्याच्या काळात फ्रीजमध्ये हाइब्रिड कूलिंग सिस्टम दिली जाते. हे टेंपरेचर स्टेबल ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेले सामान देखील खराब होत नाही. यासोबतच मॉइश्चर कंट्रोल आणि एंटी-बैक्टीरियल गॅसकेट्स सारख्या गोष्टींमुळे फ्रीज आतून स्वच्छ राहतो. फ्रीजमध्ये असलेली फळे आणि भाज्या दिर्घकाळासाठी ताज्या राहतात.
आजकाल अनेक फ्रीज कनेक्टिविटी फीचर्ससह लाँच केले जातात. वायफायने सुसज्ज असलेल्या या फीजच्या सेटिंगला मोबाईलने कंट्रोल केले जाऊ शकते. थोडे जास्त पैसे खर्च करून तुम्ही एकात्मिक कॅमेरा असलेला फ्रिज देखील खरेदी करू शकता, जो स्टॉक कमी झाल्यावर वापरकर्त्याला अलर्ट करतो.
आजकाल अनेक कंपन्यांनी कन्व्हर्टिबल कंपार्टमेंट्स देण्यास सुरुवात केली आहे. गरजेनुसार हे फ्रीज किंवा फ्रीजर म्हणून वापरले जाऊ शकतात. याशिवाय, स्लाइडिंग ट्रे किंवा फ्लेक्सिबल स्टोरेज डिझाइन भारतीय घरांसाठी अधिक योग्य आहे.
फ्रिजसह कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करताना, त्याचे एनर्जी स्टार रेटिंग तपासणे महत्वाचे आहे. रेटिंगमध्ये जितके जास्त स्टार असतील तितकी उपकरण कमी वीज वापरेल. 4 किंवा 5 एनर्जी स्टार रेटिंग असलेली उपकरणे दीर्घकाळात तुमचे वीज बिल लक्षणीयरीत्या कमी करू शकतात.
त्यामुळे जर आता तुम्ही नवीन फ्रीज खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे सर्व फिचर्स लक्षात ठेवा. कारण लेटेस्ट फीचर्समध्ये हे सर्व फीचर्स असणे अत्यंत आवश्यक आहेत.